|Friday, July 20, 2018
You are here: Home » Top News » राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी

राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येतील राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अलाहबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात 13 याचिका दाखल आहे.या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमृर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

याप्रकरणी 2010मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण 13 अपील दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विविध 8भाषांतील अपिलांचा समावेश आहे. आज दुपारी 2 वाजत अंतिम सुनावणीला सुरूवात होणार आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानूसार,अयोध्येतील या वादग्रस्त जागेचे सुन्नी वक्फ बोर्ड,निर्मोही आखाडा आणि रामलल्ला या तीन धार्मिक संघटनांसाठी विभाजन करण्यात आले होते. त्यामुळे आता सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाकडे सगळय़ांचे लक्ष लागून आहे.

 

Related posts: