यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चेला मुख्यमंत्र्यांचा नकार

ऑनलाईन टीम / आकोला :
विदर्भातील शेतकऱयांच्या मोर्चात सहभागी होऊन सरकारविरोधात निषेध आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या प्रकरणी सिन्हा यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस सिन्हा यांच्याशी बोलणार नाहीत तर त्यांचे पीए बोलतील असे जिल्हाधिकाऱयांकडून सिन्हा यांना सांगण्यात आल्याचे भाजप खासदार नान पटोले यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास खासदार वरूण गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण शौरी,खासदार शत्रुघ्न सिन्हा हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.मुख्य मागणीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचेही पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
Related posts:
Tags: yashwant sinha