|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » Top News » अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱया तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा

अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱया तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर  :

अमरनाथ यात्रेवरील यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणाऱया दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्य आणि काश्मीर पोलिसांना यश आले आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱया सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिस महासंचलकांनी दिली आहे.

याबाबतचे ट्विट शेष पॉल वेद यांनी केले आहे. सूत्रधार अबू इस्माईलच्या खात्म्यानंतर अमरनाथ यात्रेवर हल्ल करणारे अबू माविया,फुरकान आणि यावर यांना कंठस्नान घातले,असे ट्विट वेद यांनी केले आहे.सोमवारी श्रीनगर जम्मू- हायवेवर पोलिस आणि सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत एक भारतीय जवानही शाहीद झाला आहे.

Related posts: