|Friday, October 19, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » ‘ओखी’नाव कसे पडले?

‘ओखी’नाव कसे पडले? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सध्या राज्यभरात ‘ओखी’या वादाळाने धुमाकूळ घातला आहे.सोमवारपासून मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरूवात झाली असून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हायअर्ल्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचे नाव ‘ओखी’कसे पडले याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

‘ओखी’हा बंगाली भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा अर्थ डोळा असा आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ‘ओखी’नाव दिले आहे. बंगालच्या उपासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘ओखी’चक्रीवादळाची निर्मिती झाली.अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील वादळांना उष्णकटिबंधीय वादळ म्हटले जाते.2000 सालापासून वादळाला नाव देण्याची पद्धत सुरू झाली होती, भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत,बांग्लादेश,पाकिस्तान,मालदीव,ओमान,श्रीलंका,म्यानमाय,थायलेडने नाव ठरवली आहे. प्रत्येक देशाने वादाळासाठी प्रत्येकी 8अशी 64 नाव ठरवलेली आहेत. भारताने अग्नी, आकाश,बिजली,जल,लहर,मेघ,सागर,वायू ही आठ नावे सुचवलेली आहेत.

Related posts: