|Monday, January 21, 2019
You are here: Home » विविधा » डॉक्टरी पेशातील अनैतिक  बाबींवर एकजूटीने लढा  : डॉ.रवी वानखेडकर

डॉक्टरी पेशातील अनैतिक  बाबींवर एकजूटीने लढा  : डॉ.रवी वानखेडकर 

पुणे / प्रतिनिधी :

 डॉक्टरांवर होणारे हल्ले, क्रॉसपॅथी, नवीन कायदे या सर्वांचा गंभीर परिणाम रुग्णावरील उपचारांवरही होत आहे. आयएमए या कायद्याविरोधात केवळ डॉक्टरांसाठी तर रुग्णांसाठीही संघर्ष करीत असून, डॉक्टरी पेशातील अनैतिक बाबींवर  सर्व डॉक्टर संघटना एकजुटीने लढा देत आहेत, अशा भावना इंडियन मेडिकल असोसीएशनचे (आयएमए)राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी येथे व्यक्त केल्या.

 पुण्यातल अण्णाभाऊ साठे सभागृहात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वतीने  28वे  ‘मल्टीकॉन2017’या दोन दिवसीय वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन वानखेडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांवरील परिसंवाद, तसेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 600 हून अधिक डॉक्टरांनी या परिषदेला उपस्थिती लावली. आयएमए पुण्याचे अध्यक्ष डॉ.प्रकाश मराठे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. शिरीश प्रयाग यांन ‘आयएमए भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

 वानखेडकर म्हणाले, डॉक्टर हल्ल्यांवरील सर्व कायदे, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट  इतर नवीन कायदे,पीसीपीएनडीटी ऍक्ट क्रॉसपॅथी आदींचा परिणाम रूग्णांवर होत आहे. आयएमए यासर्व कायद्यांविरोधात डॉक्टरांच्या बाजूने तसेच रूग्णांच्या दृष्टीकोनातून लढत आहे. यासर्वांचा गंभीर परिणाम रूग्णांच्या सेवेरवर होत आहे. यासाठी डॉक्टरी पेशा एकजुटीने या सगळय़ा वाईट कृत्यांवर लढा देत आहे.

 कार्यक्रमाच्या आयोजन समितीतील डॉ. राजकुमार शहा, डॉ. बी.एल देशमुख तसेच डॉ.एस.एस बापट, डॉ.सुरेस पाटणकर,डॉ.निरंजन आंबेकर,डॉ.शशांक शहा,डॉ.जयश्री तोडकर,डॉ.श्रीहरी धोरेपाटील,डॉ,नीरज रायते,डॉ.जयसिंह शिंदे, डॉ.समीर मेलीकेरी,डॉ. एजी उन्नीकृष्णन, डॉ.प्रवीण पाटील, डॉ. पद्मा अय्यर,डॉ. संजय पाटील,डॉ. मिनाक्षी देशपांडे,डॉ. राजू वरयानी आदी यावेळी उपस्थित होते.

 

Related posts: