|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » छागन भुजबळांची 20 कोटींची संपत्ती जप्त

छागन भुजबळांची 20 कोटींची संपत्ती जप्त 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी तुरूंगात असलेल्या छगन भूजबळ यांची 20 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे आता भुजबळांच्या जप्त पेलेल्या संपत्तीचा आकडा 178 कोटीं रूपयांवर पोहोचला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)मंगळवारी छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली.ईडीने मंगळवारी 20 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली असून ईडीमधील अधिकाऱयांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळय़ाप्रकरणी छगन भुजबळ हे सध्या न्यायलयीन कोठडीत आहे.काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता.भुजबळांच्या जामीन अर्जावर या आठवडय़ात न्यायालय निर्णय देणार आहे.अर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील कलम 45 मुळे राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे,असे भुजबळ यांच्या वकीलांनी सांगितले होते.छगन भुजबळांच्या वतीने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालांचा दाखलाही देण्यात अला होता. त्यामुळे भुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

 

 

 

 

Related posts: