|Thursday, January 17, 2019
You are here: Home » leadingnews » राम मंदीर वादावर पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला

राम मंदीर वादावर पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रामजन्मभूमी वादावर पुढची सुनावणी 8फेब्रुवारी 2018ला होणार आहे.सुन्नी वफ्फ बोर्डाने पूर्ण कागदपत्र देण्याची मागणी केल्याने आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

राम मंदिर वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीला सुरूवात होणा र होती.ज्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होती. त्यामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचाही समावेश आहे. 1992साली बाबरी मशीद पाडली गेली होती. या गोष्टीला बरोबर 25 वर्ष पूर्ण होत असताना सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीस सुरूवात होणार आहे. याप्रकरणी 2010साली अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला होता,हायकोर्टाने अयोध्येमधली विवादीत जागा तीन भागांमध्ये विभागली होती. सुन्नी वक्फ,निर्मोही आखाडा आणि भगवान राम लल्ला,अशी ही विभागणी होती. हायकोर्टाच्या निकालाविरूद्ध 13 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

 

 

 

Related posts: