|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

कर्म चांगले असेल तर भाग्य देईल साथ

बुध. दि. 6 ते 12 डिसेंबर 2017

Courtesy costs nothing but pays much अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. चांगल्या वागणुकीला पैसे पडत नाहीत पण त्याने फायदा मात्र खूप होतो, असा त्याचा अर्थ आहे. इतरांविषयी चांगली भावना बाळगली व समाधानी वृत्ती ठेवली व सतत सर्वाचे चांगले चिंतत गेल्यास माणसे जोडली जातात, न होणारी कामेही होतात व कितीही मोठी संकटे आली तरी त्यातून दैवीकृपेने हमखास सुटका होते, आर्थिक स्थिती सुधारते, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, घरात सुख शांतता नांदू लागते, मुलाबाळांचे कल्याण होऊ लागते, घरातील व्यसने कमी होऊ लागतात. संसारसुखाचे होतात, कितीही कठोर शत्रुत्व असले तरी त्याचा वृत्तीत फरक पडतो. नोकरी गेलेली असेल तर ती परत मिळू शकते. एक वर्षभर हा प्रयोग करून पहा. वामनराव पै यांचे ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ हे पुस्तक वाचा व त्याप्रमाणे आचरण ठेवा. तुमचे जीवन पूर्ण बदलून जाईल व सुखाच्या वाटा दिसू लागतील. साधारण दिसणाऱया व रुपसौंदर्य काहीही नसलेल्या एका तरुणीचे लग्न जुळत नव्हते. सर्व उपाय करून ती थकली होती व प्रत्येकावर राग काढत होती. तिला फक्त चांगला विचार करण्यास सांगून अनुभव पाहण्यास सांगितले. दोन महिन्यात तिच्या चेहऱयावर हास्य फुलले कारण ज्यावेळी ती इतराविषयी चांगला विचार करू लागली, त्यावेळी आपसुकच तिच्या चेहऱयावर तेज दिसू लागले व स्थळेही सांगून येऊ लागली. चांगुलपणाचा किती चांगला अनुभव येतो याचे हे उदाहरण आहे. तुम्ही जर सर्वांविषयी पॉझिटिव्ह विचार करू लागलात तर कोणतेही प्रसाधन न वापरता तुमचा चेहरा आनंदी व आकर्षक दिसू लागेल. तुमचे वयही लहान दिसेल. रस्त्यातून जाताना काही लोकांना पाहिले की आपुलकी प्रेम माया वाटते, त्यांच्याविषयी चांगली भावना निर्माण होते, कारण या व्यक्ती पॉझिटिव्ह विचाराच्या असतात व सतत लोकांचे चांगले चिंतत असतात व त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या चेहऱयावर उमटते व क्रिया तशी प्रतिक्रिया या नियमानुसार त्यांच्या लहरी आपल्यापर्यंत पोचल्यावर त्यांच्याविषयी प्रेम वा आपुलकी वाटू लागते. त्याच न्यायाने जी माणसे सतत अनिष्ट चिंतन करीत असतात, त्यांच्याविषयी लोकांना तिरस्कार वाटू लागतो व त्यांचे तोंड सुद्धा पाहू नये असे  वाटू लागते. जात, धर्म, रंग, वर्ण, शिक्षण, कर्तबगारी, श्रीमंत, गरीब, देश, परदेश यांचा यात कुठेही संबंध येत नाही. पॉझिटिव्ह विचारसरणी व लोकांच्या भल्याचा विचार करू लागल्यास यशाचे दरवाजे उघडू लागतात. मानसिक नैराश्य दूर पळते. संकटे ही प्रत्येकाला असतात पण त्यातून मार्ग मिळतो पण आपले  विचार चांगले असतील तर संकटे आपोआप दूर होत असतात. समोर कुणीही चांगले बोलतात पण ज्यावेळी आपण एखाद्याच्या मागून चांगले बोलत असतो, त्याचवेळी लक्ष्मीची कृपा होण्यास सुरुवात  होते. व ज्यावेळी इतरांविषयी वाईट बोलत असतो अथवा निंदानालस्ती करीत असतो, एखाद्याच्या पोटावर पाय आणत असतो, संसार तोडण्याचा प्रयत्न केले जातात, मुद्दाम खोटय़ा नाटय़ा कंडय़ा पिकविल्या जातात, त्याचवेळी आपल्या अधोगतीला सुरुवात होते व कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास सुरू होत असतात व वेळ आली की त्याचे प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतात. निसर्गाचा हा नियम लक्षात ठेवून आपली वागणूक कशी ठेवायची हे आपण ठरविले पाहिजे. तिसरा व अंतिम भाग

मेष

 गुरुचे पाठबळ चांगले आहे. महत्त्वाची कामे करून घ्यावीत. एखाद्याला केलेल्या मदतीचा कुठेतरी फायदा झालेला दिसेल. संकटातून वाचाल. शेजारी व नातेवाईक यांच्याशी जेवढय़ास तेवढेच संबंध ठेवणे योग्य ठरेल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. नवे वाहन अथवा कोणतेही नवीन काम सुरू करण्यास अनुकूल काळ.


वृषभ

नोकरीच्या बाबतीत नव्या सुधारणा दिसून येतील. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्मयता. गुंतवणुकीच्या व्यवहारात सावध राहणे चांगले. मतभेदाचे प्रसंग उद्भवल्यास संयम बाळगल्यास मोठे यश. कोर्टकचेरीच्या संदर्भातील कामांना गती मिळेल. रहात्या वास्तूत अनुकूल फेरबदल कराल. भाडेकरू व घरमालक यांच्यातील मतभेद संपतील. कर्जाचा तगादा लावणारी पत्रे, फोन व संदेश यामुळे मनस्ताप.


मिथुन

भाग्योदय करणारे योग एखाद्या अति महत्त्वाच्या व कठीण कामात यश मिळवाल, पण मोठे खर्च निर्माण होतील. एकाचवेळी अनेक कामे स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. सर्व बाबतीत लाभदायक योग दिसतात. मूळ पत्रिकेत जर राजयोग असेल तर श्रीमंती मिळण्याची शक्मयता इतरांच्यावर अवलंबून राहिल्याने महत्त्वाची कामे खोळंबतील.


कर्क

अनेक कामांची जबाबदारी पडल्याने मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही. कामाचा ताण वाढेल. वैवाहिक जीवनाशी गैरसमज निर्माण होणार नाहीत यासाठी जपा. वाढत्या खर्चामुळे देणी घेणी रखडतील. नोकरी, व्यवसाय क्षेत्रात फेरबदल होतील. कर्जप्राप्तीसाठी प्रयत्न केला असाल तर काम होईल. शत्रुच्या कारवायावर लक्ष ठेवावे लागेल.


सिंह

मंगळ, गुरु युतीमुळे भावंडांच्यात वितंडवाद होतील. घरादाराच्या वाटण्यासंदर्भात महत्त्वाच्या वाटाघाटी सुरू होतील. नोकरी व्यवसाय व वडीलधाऱयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना घडतील. रहात्या जागेतील कटकटी कमी होऊ लागतील व नोकरीत जबाबदारी वाढल्याने ताणतणावाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.


कन्या

सरकारी कामे, परमिशन महत्त्वाच्या वाटाघाटी यात यश. धनलाभ व मुलाबाळांच्या भवितव्याची  कोणतीही कामे जपून करावीत. दैनंदिन कार्ये व्यवस्थित होतील. प्रवासात अडचणी निर्माण होतील. यासाठी अनोळखी व्यक्तीकडून खाणे, पिणे टाळा. किमती वस्तूंकडे दुर्लक्ष करू नका. जमीन, घर व आर्थिक व्यवहार जपून केल्यास चांगले.


तुळ

कुटुंबातील काही जणांच्या वैचारिक मतभिन्नतेमुळे घरात सतत अस्वस्थ वाटत राहील. धनलाभ व इतर बाबतीत चांगले योग दिसतात. कोणत्याही बाबतीत अतिरेक टाळा. संशयी वातावरण तसेच नातेसंबंध या बाबतीत सावध रहावे लागेल. दूरवरचे मोठे प्रवास टाळावेत. लग्नाच्या वाटाघाटी करताना शब्दांच्या कसरतीकडे लक्ष द्या.


वृश्चिक

अनेक महत्त्वाचे जटिल प्रश्न सोडविण्यास सहाय्यक वातावरण आहे. शत्रुपीडा असेल तर ती कमी होऊ लागेल. तिऱहाईताना महत्त्वाच्या कामात हस्तक्षेप करू देऊ नका. अडचणी निर्माण होतील. नातेसंबंध सुरळीत राहतील. याची काळजी घ्या. मित्र मैत्रिणी तसेच कुणासमोरही आर्थिक बाबींचा अथवा कमाईच्या मार्गाचा उल्लेख करू नका. निसरडय़ा जागेवरून चालताना काळजी घ्यावी. पार्टनरशिप व्यवसाय करणार असाल तर कायदेशीर बाबी तपासून पहा.

धनु

सर्व गैरसमज दूर होतील. उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. सांसारिक सौख्य चांगले राहील. अति उत्साहाला आवर घाला. घातकी रसायन व रंगापासून दूर राहिल्यास चांगले. आर्थिक दृष्टय़ा हा आठवडा समाधानकारक जाईल. अडकलेली रक्कम वसूल होईल. आवडत्या व्यक्ती भेटतील. विवाह कार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. काहीजणांचे शुमंगलही होईल.

मकर

रहात्या जागेत नोकरी व्यवसायात बदल होण्याची शक्मयता. एकाच ठिकाणी बराच काळ मुक्काम ठोकलेल्या कर्मचाऱयांना दूर जावे लागेल. शिक्षण, संतती व धनलाभ या बाबतीत उत्तम योग आहे. परदेश प्रवास अथवा दूरवरचे प्रवास योग, घरातील काही नवे बदल  उत्कर्षास कारणीभूत ठरतील.

कुंभ

बुद्धिमत्तेचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. वास्तुदोष असेल तर अडगळ बाहेर काढा. आर्थिक समस्येमुळे गैरसमज निर्माण करणारे ग्रहमान आहे. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. न जुळणारे लग्न ठरेल. रवि, शुक्र युतीमुळे काही नव्या समस्या निर्माण होतील. त्यासाठी विचारपूर्वक वागावे. नवी जबाबदारी व धनलाभाच्यादृष्टीने अनुकूल आहे. एखादे मोठे काम अथवा कंत्राट हाती लागण्याची शक्मयता.

मीन

अनावश्यक वस्तुच्या खरेदीचा मोह आवरा. आर्थिक बाबतीत सावध रहावे लागेल. काहीतरी करून दाखविण्याचा उत्साह होईल. मोठे लाभही होतील. तुमच्या अंगच्या कलागुणांना मोठे यश मिळवून देणाऱया व्यक्ती भेटतील. मानसन्मान, वाहन, घरदार या बाबतीत मोठे यश मिळवून देणारी योग. पण तरीही काही बाबतीत नियंत्रण ठेवणे आवश्यक.

Related posts: