|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » थायलंड अभ्यास दौऱयासाठी अमित वेंगुर्लेकरांची निवड

थायलंड अभ्यास दौऱयासाठी अमित वेंगुर्लेकरांची निवड 

वार्ताहर / ओटवणे: 

राज्य मानवाधिकारच्या इंटरनॅशनल हय़ुमन राईटस् जस्टिस फेडरेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ अमित बापू वेंगुर्लेकर यांची येत्या 12 ते 15 फेब्रुवारीदरम्यान थायलंड येथे होणाऱया भारत-थायलंड मैत्री सक्षमीकरण आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. या परिषदेत वेंगुर्लेकर यांना इंटरनॅशनल प्राऊड ऑफ इंडिया या पुरस्कारानेही गौरविण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या कार्पोरेट अफेयर्स मंत्रालयांतर्गत नोंदणीकृत व मान्यताप्राप्त उद्योगसमूह असलेल्या डब्ल्यू. ओय. वर्ल्ड. इंटेग्रॅटेड सर्व्हीसेस ही भारत-थायलंड मैत्री सक्षमीकरणाला समर्पित केली असून या संस्थेचा जागतिक प्रतिभाशक्तीच्या एकत्रिकरणाचा महासंकल्प आहे. या संकल्पसिद्धीसाठी समृद्ध, सशक्त, सुगम्य, स्वच्छ, सहकारवादी, स्वयंप्रकाशित व उद्यमशील नवभारत निर्मितीच्या उद्देशाने संस्थेने थायलंडमध्ये या अभ्यास परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत कला, संस्कृती, आदानप्रदान, सामाजिक न्याय, महिला, सक्षमीकरण, युवक कल्याण या विषयावर चर्चा होणार आहे.

Related posts: