|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली घाट पर्यायी मार्ग रस्त्याला अखेर मुहूर्त

आंबोली घाट पर्यायी मार्ग रस्त्याला अखेर मुहूर्त 

भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात

प्रतिनिधी / सावंतवाडी:

आंबोली घाट मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून केसरी-दाणोली फणसवडे, चौकुळ, नेनेवाडी अशा दहा कि. मी. च्या रस्त्याचे भूसंपादन प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने घाती घेतली आहे. गेली कित्येक वर्षे भिजत घोंगडे असलेल्या या पर्यायी मार्गाला मुहूर्त सापडला आहे.

गेली दोन दशकहून अधिक काळ आंबोली घाट मार्गाला पर्यायी मार्गाचा शोध सुरू होता. दाणोली-केसरी-फणसवडे-नेनेवाडी-आंबोली असा मार्ग निवडण्यात आला आहे. केसरी-फणसवडे या पर्यायी घाट मार्गाचे भिजत घोंगडे कायम होते. आंबोली घाट मार्ग दाणोलीपासून 15 कि. मी. चा आहे. या घाट मार्गातील दरडीचा धोका पावसाळय़ात कायम आहे. दरडी कोसळू नये म्हणून स्वित्झर्लंडच्या जाळय़ा उभारण्यात आल्या. या घाटमार्गाला पर्यायी मार्ग व्हावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून आहे. दरवर्षीच्या रस्ते आराखडय़ात या पर्यायी मार्गाचा समावेश होता. परंतु प्रत्यक्षात या मार्गाला मुहूर्त मिळत नव्हता. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या पर्यायी मार्गाचा तिढा सोडवून 2018 साली नव्या वर्षात हा मार्ग मार्गी लावण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. त्यामुळे दाणोली-केसरी-फणसवडे नेनेवाडी या घाटाची जमीन भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

पर्यायी घाट मार्ग केसरी-फणसवडे, चौकुळ-नेनेवाडी, घारपी, उडेली या दुर्गम डोंगराळ दुर्लक्षित गावांना या मार्गामुळे गती प्राप्त होणार आहे. भूसंपादन प्रक्रिया 10 कि. मी. रस्ता मार्गाची आहे.

Related posts: