|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ल्यात आठ होडय़ांना जलसमाधी

वेंगुर्ल्यात आठ होडय़ांना जलसमाधी 

‘ओखी’चा परिणाम : जाळीही गेली वाहून

वार्ताहर / वेंगुर्ले:

ओखी चक्रीवादळ कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकल्याने समुद्रातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. समुद्रात सुमारे दोन ते 3 फूट उंच लाटा उसळत होत्या. सोमवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास 2 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळल्याने बंदरात नांगर टाकून फिशिंगसाठी उभे 7 टॉलर्स व 1 मोठी पात यांना जलसमाधी मिळावी. गेल्या दोन दिवसात उभादांडा-मूठ, कुर्लेवाडी आणि खवणे येथील 53 मच्छीमारांची  362 जाळी समुद्रात वाहून गेल्याने नुकसान झाले. तहसीलदार शरद गोसावी व प्रांताधिकारी सुशांत खांडेकर आदींनी घटनास्थळाची पाहणी करुन नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले.

 केरळ व तामिळनाडू राज्यातून सोमवारी सायंकाळी ओखी चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकले. त्यामुळे समुद्रात दोन ते तीन मीटर उंचीच्या लाटा किनाऱयावर  आदळत होत्या. गेले दोन दिवस स्थानिक मच्छीमारांनी मासेमारी बंद ठेवली होती. वेंगुर्ले बंदारातून रविवारी मासेमारीसाठी गेलेल्या 7 टॉलर्सनी मालवण व देवगड बंदरांत आसरा घेतला असल्याची माहिती वेंगुर्ले मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन वसंत तांडेल यांनी दिली.

रविवारी रात्री 11.30 ते 12.30 या कालावधीत उभादांडा-मूठ व कुर्लेवाडी, खवणे व वेंगुर्ले बंदर या भागात दोन मीटर पाणी वाढले होते. किनाऱयावर जोरदार आदळणाऱया लाटांमुळे उभादांडा-मूठ व कुर्लेवाडी भागातील वाल्मिकी निळकंठ कुबल, दशरथ हरिभाऊ कुर्ले, महेश गणपत कुर्ले, उलका उल्हास कुबल, वेणू गणपत कुबल, नरेंद्र गणेश कुर्ले, सुरेखा सुरेश कुबल, संजय गणेश कुर्ले, चंद्रशेखर उमाकांत नवार, स्वाती राजन कुर्ले, जुवाव अंतान डिसोजा, लुडदीन जुवाव डिसोजा. दीपक रामकृष्ण कुर्ले, सुरेश विष्णू कुबल, रामचंद्र द्वारकानाथ कुर्ले, हेमकांत रामकृष्ण कुर्ले, विलास दत्तात्रय रेवंडकर, तर खवणे येथील सुमन आपा परब, मंदार दिगंबर सारंग, उमेश आत्माराम मोंडकर, मनोज दशरथ कोचरेकर, दशरथ नारायण सागवेकर, सुरेश आबा जुवाटकर, हनुमंत ज्ञानदेव कोळंबकर, सत्यवान पांडुरंग कोचरेकर, गोपाळ उत्तम कोचरेकर, प्राजक्ता प्रवीण सारंग, रघुनाथ अनंत जुवाटकर, सुगंधा नारायण मोंडकर, भरत गोपाळ मोंडकर, तुळशीदास गोपाळ मोंडकर, मोहन अच्युत ताम्हणकर, चंद्रकांत वसंत जुवाटकर, सहदेव वसंत जुवाटकर, नारायण अंकुश ताम्हणकर, चंद्रकांत अच्युत ताम्हणकर, गणपत पंडित केळुसकर, सचिन अच्युत म्हापणकर, मोंडकर रापण संघ खवणे, कोचरेकर रापण संघ खवणे, सारंग रापण संघ खवणे यांची जाळी समुदात वाहून गेल्याने नुकसान झाले.

वेंगुर्ले बंदरात 8 होडय़ांना जलसमाधी

वादळी तुफान सदृश स्थितीमुळे वेंगुर्ले बंदरात नांगराच्या दोऱया छोटय़ा फायबर होडीस बांधून ठेवून मालवण व देवगड बंदरात आश्रयास गेलेल्या टॉलर्सच्या वेंगुर्ले बंदरातील 8 होडय़ांना सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास जलसमाधी मिळली. यात हर्षदा रेडकर, सुविधा रेडकर, प्रल्हाद केळुसकर, मोजेस फर्नांडिस, कैतान फर्नांडिस, पांडुरंग साळगावकर, आनाजी रामचंद्र तांडेल व अनंत केळुसकर यांच्या होडय़ांचा समावेश आहे. यात सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर तहसीलदार शरद गोसावी, मंडळ निरीक्षक बी. एन. तुळसकर, तलाठी व्ही. एन. सरवदे, मच्छीमार नेते वसंत तांडेल, बाबी रेडकर, हेमंत मलबारी, मनोहर तांडेल, मोजेस फर्नांडिस, कैतान फर्नांडिस, आनाजी तांडेल, पांडुरंग मालवणकर आदींनी नुकसानीची पाहणी केली.

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना

सलग दोन दिवस वेंगुर्ले किनारपट्टीभागात चक्रीवादळाच्या अनुषंगाने समुद्र लाटा खवळून व पाण्याची पातळी वाढून किनारपट्टीच्या भागात, वेंगुर्ले बंदरात मच्छीमारांच्या जाळय़ांचे व होडय़ांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल करण्याच्या सूचना तहसीलदार शरद गोसावी यांनी मत्स्य अधिकाकाऱयांना दिल्या आहेत.

वादळ बुधवारपर्यंत राहणार?

सोमवारी मध्यरात्री 2.30 वाजल्यापासून शिरोडा ते निवतीसह संपूर्ण तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.  पौर्णिमेच्या दिवशी चक्रीवादळ आल्याने समुदाची पाणी पातळी वाढली होती. पौर्णिमा ते संकष्टी चतुर्थी या दरम्यान उधाण बुधवारपर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता मच्छीमारांनी वर्तविली आहे.

Related posts: