|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वादळाच्या तडाख्यामुळे कोकणपट्टी हैराण

वादळाच्या तडाख्यामुळे कोकणपट्टी हैराण 

रविवारपासून कोकण किनारपट्टीवर बदललेल्या वातावरणाचा अंदाज येऊ लागल़ा ढगाळ वातावरण आणि वाढलेले वारे यामुळे चिंता व्यक्त होऊ लागल़ी रविवारी असलेले वातावरण सोमवारी आणखी बिघडल़े  हवामान खात्याचे इशारे त्याचबरोबर क्षणोक्षणी खवळत जाणारा समुद्र यामुळे स्थानिक मच्छिमारांनी लगोलग किनाऱयावर परतण्याचा निर्णय घेतल़ा

ओखी चक्रीवादळाच्या फटक्याने कोकण किनारपट्टीवर मोठी दहशत निर्माण झाली त्यातच पौर्णिमेची भरती असल्याने किनाऱयावरील अनेकांना फटका बसल़ा भरीस भर म्हणून सुपरमून असल्याने भरतीचे स्वरूप अधिक मोठे आणि त्यामुळे गंभीर परिस्थितीला निमंत्रण ठरल़े  रविवारपासून कोकण किनारपट्टीवर बदललेल्या वातावरणाचा अंदाज येऊ लागल़ा ढगाळ वातावरण आणि वाढलेले वारे यामुळे चिंता व्यक्त होऊ लागल़ी रविवारी असलेले वातावरण सोमवारी आणखी बिघडल़े हवामान खात्याचे इशारे त्याचबरोबर क्षणोक्षणी खवळत जाणारा समुद्र यामुळे स्थानिक मच्छिमारांनी लगोलग किनाऱयावर परतण्याचा निर्णय घेतल़ा तथापि, राज्याच्या किनारपट्टीवर गुजरात, गोवा, कर्नाटक आणि अगदी केरळ, तामिळनाडूच्या मच्छिमार नौकाही काम करत असतात़ अनेक नौका 8-8 दिवसाची तयारी घेऊन मच्छिमारीसाठी आपले बंदर सोडत असतात़ ओखी या चक्रीवादळाचे पूर्वानुमान आठ †िदवसापूर्वी गंभीर स्वरूपात व्यक्त होत  नव्हत़े यामुळे वेगवेगळ्या राज्यातील नौका पूर्वीच समुद्रात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाल्या होत्य़ा किनारपट्टीनजीक खोल समुद्रात 50 ते 60 कि. मी. वेगाने वारे रविवारपासून मंगळवारपर्यंत वाहत असून त्याचा परिणाम समुद्राच्या हालचालीवर झाला. मुळात या वादळाची तीव्रता कोकणात किती प्रमाणात जाणवेल, याचा अंदाज शासकीय विभागांना नव्हता. मात्र 3 दिवसांपूर्वी खोल समुद्रात वारे वेगाने वाहू लागल्याची चाहूल लक्षात येताच कोकणातील सर्वच मच्छिमारांनी आपापल्या नौका सुरक्षित स्थळी आणण्यास सुरुवात केली. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात तामिळनाडू, कर्नाटक, केरळ व अन्य †िठकाणच्या 45 नौका नांगरण्यात आल्या. त्यातील 310 खलाशांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागल़े त्यातील अनेकांकडे अन्न-पाणी संपले होत़े सरकारकडे अन्न-पाणी देण्याची व्यवस्था नव्हत़ी  

  सिंधुदुर्ग जिह्यातील प्रामुख्याने देवगड, मालवण व अन्य बंदरात मिळून सुमारे कित्येक नौकांनी आसरा घेतल्याचे सांगण्यात आल़े देवगडात 809 खलाशी आश्रयाला आले होत़े त्यांना प्रातांधिकाऱयांनी मदत साहित्याचे वाटप केल़े केरळ राज्यातील कन्नुर जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ ए़ श्रीनिवासन यांनी देवगड येथे किनाऱयाला लागलेल्या नौकांवर असलेल्या खलाशांची भेट घेतल़ी  दापोली दाभोळमधील सर्व नौकांनी जयगड बंदरात, हर्णै बंदरातील नौकांनी आंजर्ले खाडीत नौका सुरक्षित ठेवल्या. पौर्णिमेच्या फेसाळणाऱया लाटा वेगाने किनाऱयावर धडकत धडकत पुढे येत होत्या. रविवारी रात्री साडेदहानंतर उधाणाचे पाणी भरण्यास सुरूवात झाल्यानंतर रात्री साडेबारापर्यंत समुद्राने सर्वाधिक पातळीचा उच्चांक नोंदवला. किनाऱयाच्या टोकाला असलेल्या व्यावसायिकांच्या सर्वच झोपडय़ा, त्यातील मत्स्य व्यवसायाची सामग्री, तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल आदीचे उधाणातील खवळलेल्या लाटांमुळे नुकसान झाले. आपापले साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सर्वच बंदरांवर धावपळ झाली.

याबाबत रायगड जिह्यातील रेवदंडा आणि दिघी बंदरांवर मालवाहतूक करणाऱया नौका मोठय़ा संख्येने उभ्या करण्यात आल्या. रायगडमधील दहा बंदरांसह सर्वच समुद्रकिनाऱयावर उधाणाचे पाणी आले वाढले असले तरी कोणत्याही गंभीर हानीचा प्रकार झाला नाही.  अनेकांनी आपल्या डिंगी अर्थात छोटय़ा बोटी हर्णै तालुका दापोली येथील किनाऱयावर आणल्या होत्या. उधाणाचे पाणी किनाऱयाच्या शेवटच्या टोकापर्यंत भरल्याने या डिंगी बोटी ओहोटीमध्ये वाहून गेल्या होत्या. सकाळी त्या बोटी पुन्हा किनाऱयावर आणण्याचे काम मच्छिमारांना करावे लागले. किनाऱयावरील दोन खाद्यपदार्थांच्या गाडय़ाही रविवारी रात्री उधाणाच्या लाटांनी उलटल्या. त्यातील सामानाचे नुकसान झाले. एका बर्फ व्यावसायिकाचा क्रशरही या उधाणाने उलटला. चक्रीवादळाच्या भीतीमुळे राज्यातील व परराज्यातील अनेक नौका अचानकपणे किनाऱयाला आणल्या गेल्य़ा यातील मासे नौकेतून उतरवून ते विकण्यात आल़े यामुळे माशांची आवक वाढल़ी माशांच्या किंमती वादळामुळे घटल्य़ा मच्छिमारांना याचा तडाखा बसला तरी खवय्यांना मात्र स्वस्त दरात मासे उपलब्ध झाल़े

गणपती पुळे येथे काही हातगाडय़ा समुद्र किनारी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्य़ा यातील एक हातगाडी वाहून गेल़ी मंदिर परिसरातील भाविक समुद्रावर न जाता धोक्याच्या इशाऱयामुळे तेथूनच परतत होत़े गणपतीपुळे विश्रामगृहासमोरील संरक्षक भिंत खचून गेल़ी या क्षेत्रानजीकच्या वरवडे तिवरी बंदर रस्ता लाटांच्या तडाक्यामुळे वाहून गेल़ा गणपतीपुळ्यातील अनेक पर्यटकांची आरक्षणे रद्द करण्यात आल़ी दापोली तालुक्यातील केळशी उटंबर, आडे, केळशी याठिकाणच्या मोठय़ा बोटी नेहमी हर्णै बंदरात असतात. पौर्णिमेच्या रात्री आलेल्या भरतीमुळे मच्छीमारांची झोप उडाली. काही होडय़ा लाटांच्या माऱयाने कलंडल्या. प्रचंड लाटांमुळे नांगरलेल्या होडय़ा दिवसभर हेलकावत होत्या.

सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण बंदरावर पोलिसांच्या जलदगती नौका उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्य़ा त्यापैकी सिंधु-5 व सिंधु-2 या दोन नौकात पाणी शिरल़े त्यातील सिंधु-5 या नौकेला जलसमाधी मिळाली. नौकेवर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱयांनी घुसणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केल़ा पाणी उपश्याचे त्यांचे प्रयत्न असफल ठरले आणि नौकेत लाटांचे पाणी घुसल़े  सिंधु-2 ही नौका मात्र पोलीस कर्मचाऱयांच्या सतर्कतेमुळे वाचल़ी

आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज राहण्यासाठी अनेकवेळा रंगीत तालमी घेण्यात येतात़ प्रशासकीय यंत्रणेची कसोटी या कठीण परिस्थितीत लागल़ी मालवण नगर परिषदेने जेसीबी यंत्रणा उपलब्ध करून दिल्याने जलसमाधी मिळण्याची शक्यता असलेली एक नौका समुद्र किनाऱयावर आणण्यात यश मिळाल़े चक्रीवादळाच्या इशाऱयांमुळे बंदर विभागाने जलपर्यटन सुविधा बंद करण्याच्या  सूचना दिल्य़ा वेगवेगळ्या बंदरांमध्ये 2 आणि 3 नंबरचा बावटा लावून धोक्याची सूचना दिली होत़ी मालवणात किल्ला होडी वाहतूक बंद करण्यात आल़ी  केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटकांना आकर्षक ठरणारी स्कूबा डायविंग आणि जलक्रीडा साधने बंद ठेवण्यात आल़ी परराज्यातून कोकणाकडे येणाऱया पर्यटकांनी आपले दौरे स्थगित केल़े नैसर्गिक आपत्तीमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायाला धक्का बसल़ा

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सगळ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावल़ी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होता तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्य़ा

Related posts: