|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातींनी माझ्या सवयीच बिघडविल्या !

गुजरातींनी माझ्या सवयीच बिघडविल्या ! 

राहुल गांधींचे कच्छच्या सभेतील वक्तव्य : घरात केवळ गुजराती खाद्यपदार्थ

कच्छ

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी मंगळवारी पुन्हा गुजरातमध्ये दाखल होत कच्छ येथील सभेला संबोधित केले. प्रियांका गांधी (राहुल यांची बहिण) काल माझ्या घरी आल्या होत्या, माझ्या किचनमध्ये (स्वयंपाकघर) नजर फिरविल्यानंतर तिने तेथे सर्व गुजराती खाद्यपदार्थ असल्याचे म्हटले. खाखरा, लोणचे, शेंगदाणे सर्व खाद्यजिन्नस गुजरातीच होते. तुम्हा लोकांनी (गुजरातच्या जनतेने) माझ्या सवयीच बिघडविल्या असून वजन वाढत असल्याचे उद्गार राहुल यांनी काढले.

मोदींचे भाषण ऐकतो, त्यांच्या भाषणाचा 60 टक्के भाग काँग्रेस आणि माझ्यावरच असतो. ही निवडणूक काँग्रेस किंवा भाजपविषयी नसून गुजरात आणि येथील लोकांच्या भविष्याची आहे. काँग्रेस पक्ष यंदा पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढत असून गुजरातची जनता भाजपवर नाराज असल्याचे वक्तव्य राहुल यांनी केले.

गुजरातमधील शेतकरी, सुरतच्या नागरिकांशी चर्चा करून खूप काही शिकायला मिळाले. गुजरातमध्ये काय बदलावे लागेल हे देखील समजले. गुजरातच्या शेतकऱयांची 45000 एकर जमीन हिसकावून 1 रुपये प्रतिमीटर दराने एका व्यक्तीला देण्यात आली. त्याला नर्मदेचे पाणी, वीज देण्यात आली. त्याच व्यक्तीने काही महिन्यानंतर शेतकऱयांच्या जमिनी 3-5 हजार रुपये प्रतिमीटर दराने विकून टाकली. शेतकऱयांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित झाल्यास मोदी आणि जेटली शेतकऱयांचे कर्ज माफ करणे धोरणात बसत नसल्याचे सांगतात असा आरोप राहुल यांनी केला.

सर्व आश्वासने पूर्ण करू

गुजरातच्या गरीब जनतेला 25 लाख घरे निर्माण करून देऊ. राज्यातील मुलींना मोफत शिक्षण मिळवून देण्यात
येईल. तसेच काँग्रेसच्या घोषणापत्रात नमूद असलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. काँग्रेस पक्ष जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या मनातील बाब जाणून घेईल आणि जनता जे सांगेल, ते काम करून दाखवू असे राहुल म्हणाले.

राहुल यांचे गणित चुकले

राहुल गांधी यांनी ट्विटरवर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 7 वा प्रश्न विचारला. प्रश्न विचारत त्यांनी जे आकडे दिले, त्यात गणिताची चूक करून बसले. राहुल यांची ही चूक त्वरित पकडून भाजपने त्यांनाच कोंडीत पकडले. चूक उमगल्यावर राहुल यांनी साडेतीन तासांनी आणखी एक ट्विट करत चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत समाजमाध्यमांवर हा मुद्दा चर्चेत आला.

Related posts: