|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 8 तसेच9 डिसेंबर रोजी जाहिरातींसाठी विशेष निर्देश

8 तसेच9 डिसेंबर रोजी जाहिरातींसाठी विशेष निर्देश 

अहमदाबाद 

गुजरातमध्ये 8 आणि 9 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या मंजुरीशिवाय कोणत्याही वृत्तपत्रात कुठल्याही प्रकारची राजकीय जाहिरात प्रकाशित करता येणार नाही. यासंबंधी सर्व उमेदवार, राजकीय पक्षांना आयोगाने निर्देश दिले. 2015 मध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडून वादग्रस्त जाहिरात प्रकाशित करविण्यात आल्यानंतर आयोगाने हे खबरदारीचे पाऊल उचलले. गुजरातमध्ये 9 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ‘अपमानास्पद आणि भ्रामक जाहिराती’ प्रकाशित करण्यात आल्याचे प्रकार भूतकाळात घडले आहेत. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात याप्रकारच्या जाहिराती निवडणुकीला धक्का पोहोचवितात. अशा प्रकरणांमध्ये प्रभावित उमेदवार किंवा पक्षांना स्पष्टीकरण देण्याची संधी मिळत नाही असे गुजरात मुख्य निवडणूक अधिकाऱयाने म्हटले. अशा प्रकरणांची पुनरावृत्ती होऊ नये याकरता कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा इतर कोणतीही संघटना 8 आणि 9 डिसेंबर रोजी आयोगाच्या मंजुरीशिवाय कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रकाशित करू शकणार नाही. राज्य तसेच जिल्हास्तरीय समित्यांकडून निर्धारित प्रक्रियेचे पालन करण्याचा निर्देश आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांना दिला.

Related posts: