|Monday, July 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओक्खी चक्रीवादळामुळे अमित शाह यांच्या 3 सभा रद्द

ओक्खी चक्रीवादळामुळे अमित शाह यांच्या 3 सभा रद्द 

  सुरत

गुजरात निवडणुकीत सभांचे सत्र सुरू असून या क्रमानुसार भाजपाध्यक्ष अमित शाह मंगळवारी किनारी भागात प्रचारसभा घेणार होते. परंतु सोमवारी रात्री चक्रीवादळ ओक्खी गुजरातच्या किनाऱयाला धडकल्याने त्यांच्या 3 सभा रद्द कराव्या लागल्या. राजुला, माहुआ आणि शिहोर या किनारी भागात त्यांच्या सभा होणार होत्या. ओक्खीचा प्रभाव पाहता गुजरात सरकारतर्फे राज्याच्या सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना परतण्याची सूचना करण्यात आली. समुद्रकिनारी क्षेत्रांमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करून सरकारने नियंत्रण कक्षाद्वारे स्थितीवर नजर ठेवली आहे. सुरत, राजकोट, कच्छ जूनागढ समवेत समुद्रकिनारी भागातील निवडणुकीचा प्रचार चक्रीवादळामुळे थंडावला आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या आगमनाने रॅली, प्रचारफेरी रोखाव्या लागल्या.

Related posts: