|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातला पहिल्यांदाच मिळणार पंतप्रधानांचे मत

गुजरातला पहिल्यांदाच मिळणार पंतप्रधानांचे मत 

गांधीनगर

गुजरात निवडणुकीत यावेळी एक विशेष बाब दिसून येणार आहे.  विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या मताचा वापर करताना दिसून येतील. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानाकडून मतदान होण्याची ही पहिलीच वेळ असेल. 14 डिसेंबर रोजी रानीप मतदान केंद्रावर नरेंद्र मोदी मतदानाचा हक्क बजावतील. गुजरातमध्ये याअगोदर 2002 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी मतदान केले होते. गांधीनगरचे विद्यमान खासदार असणारे अडवाणी यावेळी शाहपूर मतदारसंघातील केंद्रावर मतदान करणार आहेत.

Related posts: