|Friday, July 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दहशतवादी मुसावर नागरिकांची दगडफेक

दहशतवादी मुसावर नागरिकांची दगडफेक 

वृत्तसंस्था/ श्रीनगर, नवी दिल्ली

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जाकीर मुसा याचा बँक लुटीचा डाव नागरिकांना दगडफेक करत हाणून पाडला. काश्मीर खोऱयात प्रथमच थेट नागरिकांकडून
प्रतिकार झाल्याने दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणाऱयांसाठी धक्का मानला जात आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार करत एक लाखांची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जाकीर मूसा याने त्राल परिसरातील नूरपोरा येथील जम्मू-काश्मीर बँक लिमिटेडवर डल्ला मारण्याचा लुटण्याचा कट रचला होता. दुपारी तो आपल्या दोन सहकाऱयांसमवेत बँकेत आला. दहशतवाद्यांनी बँकेतील सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न केले. यानंतर कर्मचाऱयांना जीवे मारण्याची धमकी देत गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी बँकेबाहेर गर्दी केली. यातील काहींनी दहशतवाद्यांवर दगडफेक केली. नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कॅशियरकडील 97 हजारांची रोकड लुटत दहशतवादी मूसा व त्याचे सहकाऱयांनी पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अल कायदाने मागील काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधील म्होरक्या म्हणून जाकीर मूसा वावरत आहे. त्याने त्राल् परिसरात आश्रय घेतला असल्याचा सुरक्षा दलास संशय आहे.

 

Related posts: