|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » क्रिडा » विंडीज कर्णधारावर निलंबनाची कारवाई

विंडीज कर्णधारावर निलंबनाची कारवाई 

वृत्तसंस्था/ हॅमिल्टन

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरवर आयसीसीने एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे होल्डरला हॅमिल्टनमध्ये होणाऱया न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱया कसोटीत खेळता येणार नाही, असे आयसीसीच्या
प्रवक्त्याने सांगितले.

विंडीजचा संघ न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत षटकांची गती राखू शकला नाही. न्यूझीलंडने ही कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. येत्या शनिवारपासून येथे न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यातील दुसरी कसोटी सुरू होणार आहे. होल्डरच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाकडून गेल्या एप्रिलमध्ये पाक विरूद्धच्या जमैकातील कसोटीत षटकांची गती राखली गेली नव्हती. कर्णधार होल्डरकडून 12 महिन्यात अशा प्रकारचा दुसऱयांदा गुन्हा झाल्याने आयसीसीने त्याच्यावर एक सामन्यासाठी निलंबनाची कारवाई केली आणि सामना मानधनातील 60 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावला आहे. त्याचप्रमाणे विंडीज संघातील इतर खेळाडूंच्या मानधनातील 30 टक्के रक्कम दंड ंम्हणून वसूल केली जाईल. वर्षभराच्या कालावधीत आयसीसीच्या नियमावलीनुसार षटकांची गती न राखण्याचा गुन्हा दोनवेळा घडल्याने संबंधित संघाच्या कर्णधारावर वरील प्रकारची कारवाई करण्याची तरतूद आहे.

Related posts: