|Monday, September 24, 2018
You are here: Home » क्रिडा » स्पेन, बेल्जियमचे विजय

स्पेन, बेल्जियमचे विजय 

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

गेल्या तीन दिवसाच्या कालावधीत स्पेनने वरच्या क्रमांकावर असणाऱया आणखी एका संघाला हॉकी वर्ल्ड लीग फायनलमधील सामन्यात पराभवाचा धक्का दिला. मंगळवारी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेन्टिनावर 2-1 अशा गोलफरकाने मात केली. अन्य एका सामन्यात बेल्जियमने हॉलंडचा 3-0 असा पराभव केला.

पूर्वार्धात एका गोलने पिछाडीवर पडलेल्या अर्जेन्टिनाने उत्तरार्धातील शेवटच्या दहा मिनिटांत दोन गोल नोंदवून पूर्ण गुण वसूल केले. स्पेनने याआधी बलाढय़ हॉलंडला धक्का दिला होता. अर्जेन्टिनाने साखळी फेरीत दोन विजय मिळविले तर एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारे अर्जेन्टिना व सातव्या मानांकित स्पेन यांच्या सामन्यातील दुसऱया सत्रात कर्णधार मतायस पार्डेसने अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास 10 मिनिटे असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर पॉल क्मयुमादाने स्पेनला बरोबरी साधून दिली आणि 59 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर जोसेप रोमेयुने दुसरा गोल नोंदवून स्पेनचा विजय निश्चित केला.

बुधवारी स्पेन व ऑस्ट्रेलिया आणि भारत व बेल्जियम यांच्यात उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होणार आहेत.

Related posts: