|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सोहळा उत्साहात

स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सोहळा उत्साहात 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास (दिंडोरी प्रणित) केंद्रात श्री दत्त जयंती मोठय़ा उत्साहात संपन्न झाली. ‘श्री’ अभिषेक, आरती, होम हवन सह जन्मकाळ आदी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी जयसिगपूर शहरासह परिसरातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

27 नोव्हेंबरपासून श्री गुरूचरित्र पारायण, अखंड नाम-जप-याग सप्ताहास मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला होता. गुरूचरित्र पारायणासाठी सुमारे दोनशे पन्नास महिला व पुरूष सेवेकरी बसले होते. या सप्ताहाची सांगता सोमवारी सकाळी 10.30 वाजता महानैवेद्य आरती नंतर करण्यात आली.

श्री दत्त जयंतीनिमित्त शनिवारी पहाटे 5 वाजता ‘श्री’ अभिषेक, आरती, नित्य स्वहाकार, वलीपुर्णाहूर्ती झाली. यानंतर दुपारी शेकडो महिला-पुरूष सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत 12.39 वाजता श्री दत्त जन्मोत्सव झाला. केंद्रात फुलांची सजावट, आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. दुपारी 1 वाजता पालखी मिरवणूक, औदुंबर प्रदक्षिणा असे अनेक धार्मिक विधी संपन्न झाल्या.

यावेळी गोधर्वन दबडे, सुरेश दामटे, प्रकाश जगदाळे, राजू हरळीकर, सचिन डोंगरे, विजयकुमार कवाळे, प्रसाद कंदले, कृष्णा मसलकर, जे. ई. चव्हाण, कुसुदिनी दबडे, भारती रजपूत यांच्यासह परिसरातील सेवेकरी व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: