|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापूरात बरसल्या जलधारा

कोल्हापूरात बरसल्या जलधारा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ओखी चक्रवादळ गोवा आणि कोकणात आल्यामुळे दोन दिवसापासून कोल्हापुरात ढगाळ वातावरण झाले आहे. कधी गार वारे तर कधी उकाडा जाणवत आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता तर शहर आणि जिल्हय़ात पावसाच्या धारा बरसल्या. ऐन हिवाळयात पाऊस पडल्यामुळे नेमका कोणता ऋतु आहे याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ओखी चक्रीवादळ केरळ, तामिळनाडू, लक्ष़व्दीप असा प्रवास करत रविवारी गोवा  आणि कोकणात पोहचले. या वादळाचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हय़ात किनारपटीवर परिणाम जाणवला. या वादळामुळे गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्हय़ातील वातावरणातही बदल झाला आहे. ढगाळ आणि दमट वातावरणामुळे  नागरिक हैराण झाले आहेत. हिवाळा असताना ऐन थंडीच्या दिवसात पावसाळय़ासारखे वातावरण जाणवू लागले आहे. गार वारे आणि उकाडा याची अनुभती येत आहे.

सोमवारी सकाळीच आकाशात ढग दाटून आले. यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास सूर्यदर्शन झाले. पण सायंकाळी पुन्हा आकाशात ढगांची गर्दी झाली. तर पाच वाजण्याच्या सुमारास शहर आणि जिल्हय़ात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. ऐन हिवाळयात नागरिकांना वेगवेगळया ऋतूचा अनुभव येत आहे. 

Related posts: