|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » युवराज्ञी संयोगिताराजेंचा शिवरायांचा मानाचा मुजरा!

युवराज्ञी संयोगिताराजेंचा शिवरायांचा मानाचा मुजरा! 

प्रतिनिधी/ रायगड

युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी दुर्गराज रायगड पायी चढून छत्रपती शिवाजी महाराज आणि पूर्वजांना मानवंदना दिली. शिवछत्रपतींच्या किल्ले, गडांचा राजा म्हणून रायगड प्रचलित आहे, 6 जून रोजी किल्ले रायगड येथे संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखालील अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने मोठय़ा भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पाडतो. कोल्हापूर तसेच महाराष्ट्र आणि विदेशातून ही शिवभक्त या सोहळय़ासाठी उपस्थित असतात. या सोहळ्याच्या नियोजनात समितीच्या कार्यकर्त्यांन बरोबर समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांचा विशेष सहभाग असतो. रायगडावर येणाऱया प्रत्येक शिवभक्तांची योग्य तितकी सोय व्हावी,महिला,बालक व वयोवृद्ध यांची योग्य काळजी घ्यावी तसेच सोहळा झाल्यानंतर संपुर्ण गडाची कशाप्रकारे स्वच्छता व्हावी, गडावर प्लास्टिक कचरा होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी आशा अनेक गोष्टीचे अचूक नियोजन संयोगीताराजे या कोल्हापूर येथून करत समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना देत असतात. हे करत असताना त्यांनी मात्र रायगड प्रत्यक्षात कधीच पहिला नव्हता. दोन दिवसापुर्वीच खासदार संभाजीराजे गडावर मुक्कामास होते. त्या नंतर 2 डिसेंबर रोजी दुर्गराज रायगडाचे दर्शन घेण्यासाठी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती सकाळीच पाचाडमध्ये दाखल झाल्या.  छत्रपती घराण्याच्या  राजस्नुषा  चित्तदरवाजा मार्गे पायी गडावर आल्या. युवराज्ञी संयोगीताराजेंना पायी गडावर जाण्यास संभाजीराजेंनी व पुत्र शहाजीराजेंनी मनाई केली असताना छत्रपतींच्या राजधानीला वंदन करण्यासाठी मी पहिल्यांदाच रायगडावर जात आहे मी पायीच गडावर जाणार असा निश्चय करुन त्यांनी  तो पुर्णही केला.

गड चढण्याची सुरुवात करण्या अगोदर त्यांनी चित्त दरवाजाला वंदन करून तेथील स्थानिक विक्रेते व कार्यकर्ते आणि पर्यटक यांच्याशी संवाद साधून गडाच्या पायथ्याशी असलेला कचरा गोळा केला. गडावर जात असताना मार्गावर  असलेल्या प्रत्येक दुकानदार,ताक विक्रेते,परगावाहुन आलेले पर्यटक व शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना गडावर प्लास्टिक आणू नये या बद्दल सूचना दिल्या.

गडावर आल्यानंतर त्यांनी गड देवता शिरकाई देवी, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, मनोरे,राज सदरेवरील शिवमूर्ती,राणीवसा,शिवरायांच्या राजवाडय़ाचे ठिकाण, खलबत खाना, होळीचा माळ, नगारखाना, बाजार पेठ, जगदीश्वर मंदिर तसेच शिवछत्रपती समाधी स्थळ आदींचे दर्शन घेऊन या ऐतिहासिक वास्तू वारसांची माहिती घेतली. गडावरील प्रत्येक वास्तू, मंदिरे, अवशेष त्यांनी अत्यंत     काळजीपूर्वक पाहिली. गडावर शिवरायांनी त्याकाळी दूरदृष्टी वापरून प्रत्येक गोष्टींचे केलेले नियोजन अगदी थक्क करणारे असून आपल्या शिवरायांच्या आशा गड किल्ल्यांची सर इतर राज्यातील तसेच परदेशातील ही गड किल्ल्याना कधीच येणार नाही पण परदेशातील किल्यांची जतन व संवर्धनबाबदचे नियोजन आपण ही आत्मसात करायला हवे असे त्यांनी नमूद केले.