|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हिरण्यकेशीत संशयिताचे कपडे शोधण्यात अपयश

हिरण्यकेशीत संशयिताचे कपडे शोधण्यात अपयश 

गडहिंग्लज

भडगावपैकी चोथेवाडी येथील विजयकुमार गुरव यांचा खून त्यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि प्रियकर सुरेश चोथे यांनी केल्याची कबुली दिली आहे. खूनादिवशी सुरेश चोथे याच्या अंगावर असणारे कपडे गडहिंग्लज जवळील हिरण्यकेशी नदीत टाकल्याचे सांगितले होते. या कपडय़ांचा शोध सोमवारी सावंतवाडीच्या पोलिस पथकाने घेतला आहे. मात्र कपडे शोधण्यात अपयश आले आहे.

शिक्षक विजयकुमार गुरव याचा खून करण्याची योजना जून महिन्यापासूनच पत्नी जयलक्ष्मी आणि सुरेश यांनी आखली होती. दोन वेळेला कावळेसाद येथे जाऊन सुरेश याने रेकी केल्याचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी सांगितले. रात्री दिड-दोन च्या सुमारास विजयकुमार याचा तोंडावर उशी दाबून खून केला. त्यानंतर त्याला लोखंडी रॉडने मारले होते. रक्त गादीवर सांडल्यामुळे गादीसह विजयकुमार याचा मृतदेह घेऊन सुरेश कावळेसादला गेला होता. तेथे मृतदेह एका ठिकाणी आणि गादी एका ठिकाणी टाकली आहे. गाडीतील मॅटही दरीतच टाकली होती. मृतदेह मिळाल्यानंतर गादीही बाहेर काढली आहे. कपडे लाकूडवाडी घाटात जाळले असले तरी सुरेश याच्या अंगावरचे कपडे हिरण्यकेशीत टाकल्याचे त्याने सांगितले होते. त्याप्रमाणे आज हिरण्यकेशी नदीत नगरपालिकेच्या यांत्रिक बोटीच्या मदतीने कपडे शोधण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन विभागाचे कर्मचारी रमेश गायकवाड, भैरू कारंडे, विश्वनाथ कारंडे, महादेव बारामती आदींनी यात भाग घेतला होता. सुरेशने दाखविलेल्या ठिकाणी गळ टाकून कपडे काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नसल्याचे पोलीस निरीक्षक श्री. धनावडे यांनी सांगितले. उद्या या दोघांचीही पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर करणार आहे. या खूनात सध्यातरी दोघेच असल्याचे दिसते आहे.

Related posts: