|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गगनगडाजवळील दरीत ट्रक कोसळला

गगनगडाजवळील दरीत ट्रक कोसळला 

प्रतिनिधी/ गगनबावडा

गगनगडावरील दत्तजयंती सोहळा  आटोपून विठ्ठलाई मंदिर परिसरात लावलेला ट्रक गावी परत जाण्यासाठी मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने दरीत कोसळून ट्रकचा चक्काचूर झाल्याची घटना सोमवारी सकाळी किल्ले गगनगडावर घडली. या घटनेत ट्रक चालक राहूल कारभारी रहाणे (वय 25) गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने ट्रक मध्ये कुणीही  प्रवाशी नसल्याने मोठी जिवीतहानी टळली

गगनबावडा येथील  मर्द किल्ले गगनगडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीतीत दत्तजयंती सोहळा रविवारी पार पडला. या दत्तजयंती सोहळय़ासाठी जाकारी (ता. संगमनेर. जि. अहमदनगर) येथील सुमारे 30 भाविक ट्रकमधून आले होते. यावेळी ट्रकचालकाने ट्रक विठ्ठलाई  मंदिराच्या आवारात लावलेला होता. सोमवारी सोहळा आटोपल्यानंतर सर्व भाविक गावी जाण्यासाठी विठ्ठलाई मंदिर आवारात जमले दरम्यान ट्रक चालक राहूल रहाणे हा ट्रक परतवून लावत होता. याच वेळी त्याचा ताबा सुटल्याने ट्रक संरक्षक कठडा तोडून खोल दरीत कोसळला चालकाने प्रसंगावधान  राखून ट्रकमधून उडी मारली त्यामुळे झाडावर पडून तो गंभीररित्या जखमी झाला. तातडीने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरतील सिपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. 200 फुटावरून कोसळल्याने ट्रकचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची नोंद गगनबावडा पोलीसात झाली असून अधिक तपास सहायक फौजदार एस. एम. कोळी हे करत आहेत