|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापूरचे अनिकेत नलवडे, प्रथमेश बाजारी 16 वर्षांखालील चमूत निवड

कोल्हापूरचे अनिकेत नलवडे, प्रथमेश बाजारी 16 वर्षांखालील चमूत निवड 

प्रतिनिधी/कोल्हापूर

महाराष्ट्राच्या 16 वर्षांखालील क्रिकेट संघात कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे आणि प्रथमेश बाजारी यांची निवड झली आहे. महाराष्ट्राचा 16 वयोगटाचा संघ मुंबईत होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा साखळी पद्धतीने होणार असून सामना तीन दिवसीय आहे. महाराष्ट्राच्या गटात मुंबई, बडोदा, सौराष्ट्र, गुजरात हे चार इतर संघ आहे. निवड झालेल्या कोल्हापूरच्या अनिकेत आणि प्रथमेशकडून राष्ट्रीय स्पर्धेत भरीव यशाची अपेक्षा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी व्यक्त केली. अनिकेत नलवडे याने याआधी महाराष्ट्राच्या 14 वयोगटाच्या संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. तर प्रथमेश बाजारी याची प्रथमच राज्य संघात निवड झाली आहे. या दोघांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, उपाध्यक्ष चेतन चौगुले, सचिव माजी रणजीपटू रमेश कदम, केदार
उर्फ बाळू गयावळ यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Related posts: