|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दोन घटनांमध्ये दोघांवर खुनी हल्ला

दोन घटनांमध्ये दोघांवर खुनी हल्ला 

प्रतिनिधी/ सांगली

  सोमवारी दुपारी आणि मंगळवारी दुपारी अशा दोन वेगवेगळय़ा ठिकाणी दोघांवर खुनी हल्ला करण्यात आला. दोन्ही घटनांतील जखमींची प्रकृती गंभीर असून एकजण कुरूंदवाड येथील मदरशामध्ये शिक्षक आहे. सोमवारी झालेल्या खुनी हल्लाप्रकरणी छोटय़ा बाबरसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही हल्ल्यांवरून शहरात अफवांचे पीक उठले होते.

 याबाबत माहिती अशी सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रमातानगर गोंधळे प्लॉट येथे राहणाऱया किरण रूपेश भंडारे (20) या युवकावर नऊ जणांनी हल्ला केला. पूर्वी झालेल्या एका भांडणामध्ये मध्यस्थी केल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी त्याच्यावर शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशिदसमोर हल्ला करण्यात आला होता. त्याला मारहाण करत असताना टोळक्याने किरणचा मामा विकी आणि भाऊ राहुल यांनाही मारहाण करण्यात आली आहे.याप्रकरणी किरण भंडारे याने दिलेल्या फिर्यादीवरून रोहित बाबर, राहुल बाबय, मोठय़ा मेघशाम जाधव,बारक्या जाधव, शेखर (पूर्ण नाव समजू शकले नाही), विनू निकम, धना भोसले, ओsंकार जाधव, यांच्यासह तीन अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 याबाबत माहिती अशी, किरण भंडारे याच्या ओळखीचा सैफ आणि संतोष जाधव, रोहित बाबर यांच्यात दोन दिवसांपूर्वी शंभर फुटी रोडला वाद  झाला होता. त्यावेळी किरण भंडारेने मध्यस्थी करून तो वाद मिटवला होता. सोमवारी किरणच्या भावाचा वाढदिसव असल्याने तो त्याच्या तयारीसाठी साहित्य आणण्यासाठी बाजरात निघाला होता. त्यावेळी दोन मोटारसायकल आणि एका चारचाकीतून कोयता, लाकडी दांडकी आणि लोखंडी गज घेऊन आलेल्या संशयितांनी त्याच्यावर पाकिजा मशिदजवळ हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून सोमवारी रात्री उशीरा त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

बसस्थानकाजवळ शिक्षकावर हल्ला

 मंगळवारी दुपारी कुरूंदवाड येथील मदरशामध्ये शिक्षक असणाऱया अब्दुल रशीद शेख (32 रा. रूई इचलकरंजी) यांच्यावर तिघा युवकांनी सांगलीत बसस्थानकाशेजारी असणाऱया हॉटेल कृष्णा इंटरनॅशनल समोर खुनी हल्ला केला. याबाबत माहिती अशी, अब्दुल शेख यांची सांगलीत मुजावर प्लॉट येथे सासुरवाडी आहे. सोमवारी ते मित्रासोबत सासुरवाडीला आले होते. मंगळवारी दुपारी दीड
वाजण्याच्या सुमारास ते पायी चालत बसस्थानकाकडे निघाले होते. त्यावेळी एक चारचाकी गाडी त्यांच्या आडवी मारण्यात आली. त्यांनी चालकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात वादावादी झाली. गाडीतील तिघा युवकांनी उतरून थेट त्यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यांच्या छाती, पोट आणि उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, एका युवकाने मारहाण करणाऱयांना ओळखले असल्याचे समजते. पण, रात्रीपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Related posts: