|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रानमांजराच्या पिल्लास वाचविण्यात यश

रानमांजराच्या पिल्लास वाचविण्यात यश 

महाबळेश्वर

:  युवकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वाघाटी म्हणून प्रचलित असलेल्या दुर्मिळ जातीच्या रानमांजराच्या पिल्लास वाचविण्यास वन विभागाला यश आले. बिबटय़ासारखे दिसणारे हे पिल्लू तीन ते चार महिने वयाचे होते. हे रानमांजर इंग्रजीत लेपर्डकॅट म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या जंगलात मोठय़ा प्रमाणात विविध प्राणी आहेत. यामध्ये दुर्मिळ समजल्या जाणाऱया रानमांजराचाही समावेश आहे. अगदी बिबटय़ासारखे दिसणारे हे रानमांजर या भागात मुबलक प्रमाणात आढळते. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मांघर गावाच्या हद्दीत हे पिल्लू रस्ता ओलांडून जात होते. अमोल गाढवे हे आपले वाहन घेऊन महाबळेश्वरकडे येत होते. त्यांनी हे पिल्लू सोबत घेतले व थेट वन विभागाचे हीरडा वन विश्रामगृह गाठले. तेथे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांच्या ते स्वाधीन केले. त्यांनी या पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली. हे पिल्लू जखमी नाही. त्यांनी पिल्लास दुध पिण्यास दिले. काही वेळातच या पिल्लाची हालचाल सुरू झाली. दुपारनंतर ज्या ठिकाणाहून हे पिल्लू आणले होते, त्याच जागी ते पुन्हा सोडण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांनी दिला

 

Related posts: