|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हरमल किनाऱयार नियंत्रण रेषेची गरज

हरमल किनाऱयार नियंत्रण रेषेची गरज 

वार्ताहर/ हरमल

ओखी वादळामुळे हरमल-कोळंब भागात कोसळलेले दोन शॅक्स व पाणी घुसण्याचा प्रकार घडला होता. किनारपट्टीवरील संरक्षक भिंतीमुळे कोसळले. सध्या सदर भिंतीमुळे व दक्षिणेच्या वाऱयामुळे समुद्रातील पाण्याचा प्रवाह भिंतीवर येऊन धडकतो. त्यामुळे आणखीन गतीने पाणी किनाऱयास धडकते. त्यामुळे सदर ठिकाणी सिमेंटचे दगड घालणे क्रमप्राप्त असल्याचे मत हरमल पंचायतीचे पंच सदस्य इनासियो डिसोझा यांनी व्यक्त केले.

पर्यटन खाते सक्षम हवे यासाठी येथील नागरिक गेली कित्येक वर्षे नियंत्रित रेषेची मागणी करीत आहेत. किनारी भागातील व्यावसायिक लालसेपोटी स्वत:ची जागा मानून दुकाने थाटतात. मात्र त्याचा परिणाम असा होत असतो. याचे भान संबंधितांना नसते, असे मत एका ग्रामस्थाने व्यक्त केले.

शासन नुकसान भरपाई देण्यास बांधील असले तरी तत्पूर्वी किनाऱयाची नियंत्रण रेषा ठरविणे तितकेच गरजेचे आहे. फक्त शॅक्स वाटपावेळी केवळ अस्तित्व दाखविणारे पर्यटन खाते लोकांना अधिकार व मालकीच्या जागेबाबत जागरुकता का दाखवित नाही, असा सवालही येथील नागरिकांनी केला आहे.

Related posts: