|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दिव्यांग कायदा अंमलात आणणारे गोवा पहिले राज्य

दिव्यांग कायदा अंमलात आणणारे गोवा पहिले राज्य 

समाज कल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांचे उद्गार

प्रतिनिधी/ मडगाव

केंद्र सरकारने दिव्यांग विषयक कायदा केला आहे. या कायदय़ाची अंमलबजावणी करणारे गोवा हे पहिले राज्य असल्याची माहिती समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काल मंगळवारी आंतरराष्ट्रीय अपंगत्व दिन कार्यक्रमात बोलताना दिली. मडगाव रवींद्र भवनात समाज कल्याण खाते, संगत संस्था व कलरकॉन एशिया प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अंपगत्व दिनाचे आयोजन केले होते.

सध्या गोव्यात जवळजवळ 33 हजार लोक दिव्यांग आहेत. त्यामुळे सरकार व एनजीओ यांच्यासमोर हे खऱया अर्थाने एक आव्हान आहे. दिव्यांग कायदा गोव्यात लागू करण्यात आला असून त्या संदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याची माहिती मंत्री मडकईकर यांनी या प्रसंगी दिली.

खास उपसंचालक नियुक्त करणार

दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच हा कायदा सरकारने प्राधान्यक्रमाने राबविणार आहे. या कायदय़ात दिव्यांग व्यक्तीसाठी अनेक तरतुदी केलेल्या आहेत. हा कायदा जर चांगल्या प्रकारे चालला तर त्याचा फायदा अनेक दिव्यांग लोकांना होईल व त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. समाज कल्याण खाते एक वेगळय़ा दृष्टीकोनातून या दिव्यांगाविषयी विचार करत आहे. त्यामुळे अशा या अपंग लोकांचे प्रश्न हाताळण्यासाठी, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी, फक्त त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी यंदा आम्ही उपसंचालक नियुक्त करणार आहोत.

सुरुवातीला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर समाज कल्याण खात्याचे संचालक एस. व्ही. नाईक, संगत सदस्य पर्सी कार्दोज, कलरकॉनचे व्यवस्थापक राजेश परब, संस्थापक आणि सीईओ स्कोफाऊंडेशन, नवी दिल्ली जॉर्ज अब्राहिम, राज्य आयुक्त (अपंगत्व) अनुराधा जोशी उपस्थित होते. यावेळी संगत संस्थेच्या सदस्या पर्सी कार्दोज यांनी आपल्या संस्थे sविषयी माहिती दिली. राजेश जोशी यांनी स्वागतपर भाषण केले. जॉर्ज अब्राहिम यांनी आपले अनुभव सांगितले. अनुराधा जोशी यांनी दिव्यांगत्वाविषयीची माहिती दिली.

Related posts: