|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्यटकाना प्रोत्साहन देणाऱया ब्लॅक टायगर अस्थापनाचे उद्घाटन

पर्यटकाना प्रोत्साहन देणाऱया ब्लॅक टायगर अस्थापनाचे उद्घाटन 

प्रतिनिधी/ म्हापसा

पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी व पर्यावरण व राज्यातील विविध पर्यटन क्षेत्राची पर्यटकांना योग्य माहिती द्यावी या दृष्टीकोनातून स्थापन करण्यात आलेल्या ब्लॅक टायगर ऍडव्हेंचर अस्थापनाचे उद्घाटन समाजसेवक रुडोल्फ फर्नांडिस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर उपस्थित होते.

निलेश वेर्णेकर, सतीश व अमित या तिघांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी बोलताना फर्नांडिस यांनी हा उपक्रम योग्यरित्या पुढे न्यावा व पर्यटकांना चांगली सेवा द्यावी असे सांगितले.

यातिघानी मिळून ब्लॅक टायगर सेक्युरिटी सेवा सुरु केली. आता त्यांनी वागातोर येथे येणाऱया पर्यटकाना योग्य दिशा व माहिती देण्यासाठी आस्थापन सुरु केले. या अस्थापनाचा सर्वांनी फायदा करुन घ्यावा. व पर्यटकाना योग्यरित्या माहिती देऊन आपली प्रामाणिकपणे सेवा बजवावी असे हरमलकर यांनी सांगितले.

Related posts: