|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा राज्य चित्रपट महोत्सवासाठी लवकर नेंदणी करा

गोवा राज्य चित्रपट महोत्सवासाठी लवकर नेंदणी करा 

गोवा चित्रपट निर्मार्त्यांना गोवा मनोरंजन संस्थेचे आवाहन

प्रतिनिधी/ पणजी

 नववा गोवा राज्य चित्रपट महोत्सव एप्रिल 2018 मध्ये होणार असून गोव्यातील ज्या चित्रपट निर्मात्यांनी 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत चित्रपट केले आहे त्यांचे चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार आहे, असे यावेळी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद तालक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

ज्या निर्मार्त्यांनी या कालावधीत चित्रपट केले आहे ज्यांचे चित्रपट पूर्ण होत आले आहे त्यांनी लवकरात लवकर सेन्सर बोर्डकडून प्रमाणपत्र घेऊन या महोत्सवामध्ये आपली नेंदणी करावी. या महोत्सवामध्ये कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषातील चित्रपट दाखविले जाणार आहे, असे यावेळी तालक यांनी सांगितले.

 गोवा मनोरंजन संस्था चित्रपट निर्मात्यांसाठी व चित्रपट प्रेमीसाठी अनेक चित्रपट महोत्सव साजरे करत आहे. मागिल वर्षभरात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट महोत्सव, युरोपियन चित्रपट महोत्सव, गिरीश कासारवली चित्रपट महोत्सव, तसेच सिनेफिल क्लब समस्यांसाठी दर गुरुवारी चित्रपट मार्गदर्शत कार्याशाळा दाखविली जाते.

 तसेच युवा चित्रपट प्रेमींना व्यासपीठ देण्यासाठी ऍन्टी टोबॅको चित्रपट महोत्सव, पर्यावरण चित्रपट महोत्सव, चित्रपट कार्यशाळा चित्रपट पत्रकारिता कार्यशाळा असे विविध कार्यक्रम केले जातात. त्याला राज्यभरातील चित्रपट प्रेमींना चांगला पाठींबा मिळत आहे. सिनेफिल सदस्यासाठी आता 14 डिसेंबर पासून दर गुरुवारी स्क्रीनींग दाखविली जाणार आहे.

 नुकत्याच झालेला आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यशस्वी पार पडला एकूण 7 हजार 118 प्रतिनिधींची नेंदणी केली होती. हा चित्रपट महोत्सव चांगल्या प्रकारे यशस्वी झाला. जगभरातील चित्रपट रसिकांनी या महोत्सवाचा आस्वाद घेतला, असे यावेळी  तालक यांनी सांगितले.

Related posts: