|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विधानसभा अधिवेशन 13 पासून

विधानसभा अधिवेशन 13 पासून 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा विधानसभेचे चार दिवसांचे अधिवेशन 13 ते 18 डिसेंबर या कालावधित होणार असून त्यातील कामकाजास मंगळवारी झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन झाले होते. त्यानंतर सहा महिन्याच्या कालावधित दुसरे अधिवेशन होण्याची तांत्रिक गरज पूर्ण करण्यासाठी या अधिवेशनाची आखणी करण्यात आली आहे. अधिवेशनाचा कालावधी सहा दिवसांचा असला तरी प्रत्यक्ष कामकाज चारच दिवसांचे होणार आहे. 13 रोजी बुधवार असून गुरुवार व शुक्रवार असे तीन व त्यानंतर सोमवार असे चार दिवस कामकाज चालणार आहे. अधिवेशनात चार सरकारी विधेयके असून सुमारे 700 प्रश्न विचारण्यात आले आहेत. नद्यांचे राष्ट्रीयीकरण, कोळसा वाहतूक व अन्य अनेक विषय चर्चेसाठी येणार आहेत.

Related posts: