|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जवानाची पोखरण येथे आत्महत्या

जवानाची पोखरण येथे आत्महत्या 

प्रतिनिधी / बेळगाव

  कणबर्गी येथील रहिवासी (मूळगाव पाच्छापूर ता. हुक्केरी) असणाऱया आणि सध्या पोखरण (राजस्थान) येथे लष्करात सेवा बजावत असलेल्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याचे पार्थिव मंगळवारी रात्री गोवामार्गे बेळगावला आणण्यात आले.

संतोष बसाप्पा वकुंड (वय 38) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा बुद्याळ (पाच्छापूर, ता. हुक्केरी) येथील रहिवासी होता. मागील 8 वर्षांपासून त्याचे कुटुंबीय कणबर्गी येथे राहतात.

संतोष याने लष्करात मागील 17 वर्षांपासून सेवा बजावली होती. पुढील वषी ऑक्टोबर महिन्यात तो सेवानिवृत्त होणार होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली. पोखरण येथे त्याचे वास्तव्य असणाऱया त्याच्या खोलीमध्ये त्याने स्वतःच्या डोक्मयात गोळी झाडून घेतली. त्याच्या सहकाऱयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचाराचा उपयोग झाला नाही आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कुटुंबीयांना सोमवारी रात्री फोनवरून कळविण्यात आली. त्याचा मृतदेह मंगळवारी रात्री विमानाने गोवामार्गे बेळगावला आणण्यात आला. उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.       

Related posts: