|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » समादेवी गल्लीतील हरी मंदिरात चोरी

समादेवी गल्लीतील हरी मंदिरात चोरी 

प्रतिनिधी / बेळगाव

समादेवी गल्ली येथील श्रीहरी मंदिर देवस्थानातील ऐवज येथे चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी मंदिराच्या खिडकीचे गज आणि कोयंडा कापून हा प्रकार केला आहे.

गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या या मंदिरात असणाऱया देवीच्या चांदीच्या मुखवटय़ासह इतर सामग्री लंपास करण्यात आली आहे. देवपूजेची चांदीची भांडी व इतर किमती ऐवज चोरटय़ांनी लांबविला आहे. मारुतीचे चांदीचे कवच, सरस्वतीची मूर्तीही चोरली आहे. येथे रक्कम शोधण्याच्या उद्देशातून चोरटय़ांनी कपाट खाली टाकून त्यातही शोधाशोध केली.

खडेबाजार पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकारामध्ये एकूण साडेपाच हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

Related posts: