|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » समर्थनगर येथे भात-गवत गज्यांना आग

समर्थनगर येथे भात-गवत गज्यांना आग 

प्रतिनिधी/ बेळगाव

 समर्थनगर येथील हरिकाका कंपाऊंडच्या मागील बाजूस असलेल्या शिवारातील बासमती भाताची गंजी आणि दोन गवत गंज्यांना आग लागल्याने सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग सोमवारी मध्यरात्री लागली असून अग्निशमन दलाच्या साहाय्याने मंगळवारी पहाटे आग विझविण्यात आली. यामुळे  या ठिकाणी असलेल्या आणखी दोन गवत गंज्या वाचविण्यात यश आले आहे.

  समर्थनगरच्या पाठीमागे पिकावू शेती आहे. तेथील मल्लाप्पा गेंजी व विजय गेंजी रा. ताशिलदार गल्ली यांनी दोन दिवसांपूर्वीच भाताची मळणी करून ठेवलेल्या दोन गंज्या जळून भस्मसात झाल्या आहेत. तसेच भांदूर गल्लीतील मनोहर कणबरकर यांची बासमती भाताची घातलेली गंजी आगीत भस्मसात झाली आहे.  सदर आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय शेतकऱयांनी व्यक्त केला आहे.

याची खबर तातडीने बेळगाव सर्कल, तलाठी तसेच एपीएमसी सदस्य यांना देण्यात आली. यानंतर तलाठय़ांनी पंचनामा केला. बेळगाव एपीएमसी सदस्य तानाजी पाटील यांनी घटनेची पाहणी केली.

Related posts: