|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धर्मवीर संभाजी चौकात ट्रक नादुरुस्त

धर्मवीर संभाजी चौकात ट्रक नादुरुस्त 

प्रतिनिधी / बेळगाव

धर्मवीर संभाजी चौक परिसरात मंगळवारी सायंकाळी गर्दीच्या वेळेतच एक ट्रक बिघडून रस्त्यात थांबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे येथून ये-जा करणाऱया वाहनधारक आणि नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला.

कॉलेज रोडकडून खानापूरकडे जाणारा ट्रक धर्मवीर संभाजी चौकात आला असता त्याचा एक्सल तुटला. त्यामुळे ट्रकचे टायर निखळून रस्त्यावर पडले. त्यामुळे ट्रक जागेवरच थांबला. या प्रकाराने पाठीमागून येणाऱया वाहनांची रांग लागली. काही वेळापर्यंत रहदारीची कोंडी झाली. त्यानंतर येथे बॅरिकेड्स लावून रहदारी नियोजनासाठी प्रयत्न करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती चौकात याच ठिकाणी अनेक वेळा वाहने थांबून राहण्याचा प्रकार घडतो. याची दखल घेऊन येथे रहदारी पोलिसांकडून व्यापक नियोजनाची गरज आहे.   

Related posts: