|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बी.के.मॉडेल हायस्कूलमध्ये समाजविज्ञान प्रतिकृती प्रदर्शन

बी.के.मॉडेल हायस्कूलमध्ये समाजविज्ञान प्रतिकृती प्रदर्शन 

प्रतिनिधी / बेळगाव

येथील बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये आयोजित समाजविज्ञान विषयावरील प्रतिकृती प्रदर्शनाचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रकल्पांमधून इतिहास, भूगोल या विषयांचे सविस्तर दर्शन घडविण्यात आले.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पाहुणे म्हणून तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपल्या मातृभाषेतील शिक्षणाचा अभिमान बाळगावा, असे सांगितले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. के. मादार, वासुदेव घोटगे इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सध्या पुजार, एन. एस. पै शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राम गुरव, नितीन शिंदे आदींनी केले.   

Related posts: