|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शॉर्टसर्किटने 12 एकर ऊस खाक

शॉर्टसर्किटने 12 एकर ऊस खाक 

वार्ताहर/ रायबाग

शॉर्टसर्किटने 12 एकरातील ऊस खाक झाल्याची घटना कंकणवाडी (ता. रायबाग) येथे सोमवारी घडली. आगीत सत्यराज महादेव नाईक, वसंत महादेव नाईक, अशोक महादेव नाईक व लक्ष्मीकांत महादेव नाईक यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतातील 15 नारळाची झाडे, 5 आंब्याची झाडे व एक ट्रान्स्फॉर्मरही जळाला आहे. या घटनेत सुमारे 10 ते 15 लाखांचे नुकसान झाले आहे. 

घटनेविषयी अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी नाईक यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणाने उसात ठिणगी पडली. त्यामुळे उसाला आग लागली. वाऱयाच्या दबावामुळे आगीने क्षणात रौद्ररुप धारण केले. त्यामुळे बघताबघता 12 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. याची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱयांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात आली नाही.

नागरिकांनी तत्काळ हेस्कॉमच्या अधिकाऱयांना कळवून या भागातील विद्युत पुरवठा बंद केला. त्यामुळे पुढील भागातील ऊस बचावला. शेतात असणारी 15 नारळाची व 5 आंब्याची झाडे तसेच एक टिसीही या आगीत जळाला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार के. एन. राजशेखर व साहाय्यक कृषी संचालक एन. सी. मण्णिकेरी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी महसूल अधिकारी अमर नवरत्न, हणमंत साने आदी उपस्थित होते.

नुकसान भरपाई मिळवून देणार

येथील शेतकऱयांनी मोठय़ा कष्टाने उसाचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. त्याला शॉर्टसर्किटने आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा मोठा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. नुकसानग्रस्त शेतकऱयांनी आपल्या नुकसानीचे प्रस्ताव पाठवावेत, असे तहसीलदार के. एन. राजशेखर यांनी सांगितले.

Related posts: