|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उद्यान निर्मितीची फाईल झाली गायब

उद्यान निर्मितीची फाईल झाली गायब 

प्रतिनिधी/ बेळगाव

शिवाजीनगर परिसरातील उद्यानाचे काम करण्याची मागणी करून याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. सहा महिन्यांपासून फाईल गायब झाली आहे. यामुळे उद्यान निर्माण करण्याचे काम रखडले आहे. मनपा कार्यालयात काय कारभार चाललाय? असा प्रश्न मीनाक्षी चिगरे यांनी केला. फाईल आणल्याशिवाय बैठकीत पुढील विषय घेऊ नये, अशी मागणी केल्यामुळे बैठकीत अर्धा तास कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही.

बांधकाम स्थायी समिती बैठक पिंटू सिद्दिकी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी मीनाक्षी चिगरे यांनी उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे   फाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न उदयकुमार तळवार यांनी केला. फाईल विविध अधिकाऱयांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आली असल्याने प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा काढून काम सुरू करण्यात येईल, असे उदयकुमार तळवार यांनी सांगितले. फाईलच्या मुद्दय़ावर जोरदार चर्चा झाली. पण यानंतर बैठक झाली नसल्याने तहकूब करण्यात आली.

  शहरात विविध कंपन्यांच्या केबल घालण्यात येत आहेत. पण यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कंपन्यांनी मनपाकडून परवानगी घेतली आहे का? असा मुद्दा अध्यक्षांनी उपस्थित केला. परवानगी नसेल तर काम थांबवा, अशी सूचना केली.   ?सार्वजनिक इमारत बांधकाम परवानगी विभागाचे नगरयोजना अधिकारी आर. एच. कुलकर्णी यांना बोलावून चौकशी करण्यात आली असता, केबल घालण्यासाठी परवानगी घेतली असल्याची माहिती दिली. यामुळे या वादावर पडदा पडला. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. याबाबत सर्व अहवाल सादर करण्याची सूचना महापौर संज्योत बांदेकर यांनी केली. ?

 जुन्या हायमास्टची यादी देण्याची सूचना

  शहरातील हायमास्ट बंद असून दुरुस्तीची कामे होत नाहीत, त्याचप्रमाणे नव्याने बसविण्यात असलेले हायमास्ट अद्याप सुरू नाहीत, अशी तक्रार जयश्री माळगी यांनी केली. सर्व हायमास्ट सुरू करण्यासाठी हेस्कॉमला धनादेश देण्यात आला आहे, पण विद्युत जोडणी झाली नसल्याने हायमास्ट सुरू नसल्याची माहिती साहाय्यक अभियंत्या इनामदार यांनी दिली. ?नव्याने हायमास्ट बसविण्यात येत आहेत, पण जुने हायमास्ट दिवे कुठे जातात याची माहिती प्रथम द्या, अशी सूचना राकेश पलंगे यांनी केली. यामुळे या मुद्दय़ावर चांगलीच चर्चा रंगली. काढण्यात आलेल्या जुन्या हायमास्टची यादी अध्यक्षांकडे द्या, अशी सूचना शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी अभियंत्यांना केली.

  ?डेबरिज आणि इमारत बांधकाम परवानगी आदींबाबत चर्चा करण्यात आली. अनधिकृत बांधकामांबाबत चर्चा करून अशांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी केला. मनपा कायद्यानुसार 321 नोटीस बजावून कारवाई केली जाते, अशी माहिती आर. एच. कुलकर्णी यांनी दिली. पण कारवाई करण्यापूर्वीच न्यायालयामधून इमारत पाडण्यास स्थगिती मिळविली जाते, ही बाब निदर्शनास आली. यामुळे कॅव्हेट घेऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना उपमहापौर मंडोळकर यांनी केली. पण याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. तसेच दि. 12 रोजी इमारत बांधकाम परवानगी आणि पथदीपांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  यावेळी महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, सदस्या मीनाक्षी चिगरे, राकेश पलंगे, मधुश्री पुजारी, जयश्री माळगी, श्रेयला जनगौडा आदींसह उपायुक्त मन्मतय्या स्वामी, कौन्सिल सेपेटरी लक्ष्मी निपाणीकर, साहाय्यक कौन्सिल सेपेटरी पिरजादे, साहाय्यक पर्यावरण अभियंते उदयकुमार तळवार, साहाय्यक कार्यकारी अभियंते एस. एस. हिरेमठ, आर. ए. शेट्टर आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

Related posts: