|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाबासाहेबांचे विचार घेवून निघाली प्रकाश फेरी

बाबासाहेबांचे विचार घेवून निघाली प्रकाश फेरी 

बेळगाव / प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेजोमय स्मृतीला अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विविध दलित संघटनांच्यावतीने मंगळवारी शहरातून प्रकाश फेरी काढण्यात आली. धम्मम शरनम गच्चामी च्या सुरात ही प्रकाश फेरी सामाजिक समानता व एकात्मताचा संदेश देवून गेली. मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांच्या हस्ते फेरीचा शुभारंभ करण्यात आला.

 प्रारंभी मनपा एससी एसटी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन देमट्टी यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार घालण्यात आला. विमल किर्ती भंतेजी, अग्गधम्म भंतेजी, चित्रदुर्ग येथील चलवादी पिठाचे पिठाधिश नागो देवरू यांच्या हस्ते प्रकाश फेरीतील रथाचे पूजन करण्यात आले.

धर्मवीर संभाजी चौकपासून सुरू झालेल्या या फेरीची चन्नम्मा चौक येथे सांगता झाली. फेरीमध्ये शाळकरी मुलांनी सहभाग घेवून आम्ही बाबासाहेबांचे विचार पुढे घेवून जाण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी माजी केपीसीसी सदस्य शंकर मुनवळ्ळी, मल्लेश चौगुले, मारूती चौगुले, के. डी. मंत्रेशी, डॉ. चंद्रकांत वाघमारे, सतीश चौगुले, कल्लप्पा रामचंदन्नावर, चंद्रहास अणवेकर, दिपक चौगुले, शिवपुत्र मेत्री, रमेश बस्तवाडकर, आनंद कांबळे यासह इतर दलित बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: