|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » पुण्यात मुलाकडून जन्मदात्यांची गळा चिरून हत्या

पुण्यात मुलाकडून जन्मदात्यांची गळा चिरून हत्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

मुलाने जन्मदात्या आई वडीलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील शनिवार पेठेत घडली आहे. दारूच्या नशेत हीहत्या केल्याची माहिती समोर आली आहे . पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

प्रकाश क्षीरसागर (60),आशा प्रकाश क्षीरसागर(55) असे मृतांचे नाव असून  पराग प्रकाश क्षीरसागर असे मुलाचे नाव असून त्याने आई वडिलांची गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वतः च्या हातावर धारदार शस्त्रानं वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मिळालेल्या माहितीनूसार, पराग हा बेरोजगार असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे.त्याने दारूच्या नशेत वडिलांवर काचेच्या सहाय्याने वार केले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोरीच्या सहाय्याने आईचा गळा आवळून खून केला. या घटनेनंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत स्वतःवर वार केले. पोलिसांनी परागला ताब्यात घेतले  व उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.  

 

 

 

 

Related posts: