|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » महापरिनिर्वाण दिन ; चैत्यभूमीवर भीप्रेमींची गर्दी

महापरिनिर्वाण दिन ; चैत्यभूमीवर भीप्रेमींची गर्दी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाणदिननिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱयातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानावाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कात पोहोचले आहे.त्यामुळे संपूर्ण दादर परिसर भीमअनुयायांनी गजबजून गेला आहे.

दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात.मात्र यंदा ओखी वादळाचा फटका अनुयायांना बसला.मंगळवारी संध्याकाळी शिवाजी पार्कातील मंडप कोसळला,यात तीन जण जखमी झाले होते.य् ाा गोंधळामुळे संध्याकाळी अनेक अनुयायी पावसात भिजतच थांबले होते.महापालिकेने अनुयायांची व्यवस्था महापालिका शाळांमध्ये केली होती.मात्र याची माहिती अनुयायांना नव्हती,या कारभरावर अनुयायांनी नाराजी व्यक्त केली होती.अनेक समाजसेवी संघटनांही अनुयायांच्या मदतीसाठी धावल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानावाला अभिवादन पेले.

 

Related posts: