|Friday, October 19, 2018
You are here: Home » विविधा » राज्यात विमानतळ,रेल्वे आणि बँकेतही मराठीची सक्ती

राज्यात विमानतळ,रेल्वे आणि बँकेतही मराठीची सक्ती 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठीच्या मुद्यावरून मनसे आक्रम झाल्यानंतर आता राज्य सरकराने राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी,इंग्रजीसह मराठी भाषाही बंधनकारक केली आहे. बँक,टपाल,विमा,रेल्वे,मेट्रो,विमानतळ अशा विविध ठिकाणांवर मराठी भाषेचा वापर बंधनाकारक असे राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने 5 डिसेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. राज्यातले केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या प्रमुखांना परिपत्रकाची प्रत पाठवण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या त्रिभाषानूसार, इंग्रजी व हिंदी बारोबरच प्रादेशिक भाषेचा म्हणजेच राज्यात मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. रेल्वे,मेट्रो,मोना रेल व विमानतळावरील आगमन -निर्गमन निर्देशफलक,वेळापत्रक ,सूचना व अनुदेश फलक आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीत मराठीचा वापर करावा,असे परिपत्रकात म्हटले आहे.

 

 

 

 

Related posts: