|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » व्यवसाय करात कपात करण्याची मागणी

व्यवसाय करात कपात करण्याची मागणी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2018 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. बुधवारी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. भारतीय उद्योजकांनी व्यवसाय करात कपात करणे, गुंतवणुकीसाठी अजून सवलती जाहीर करणे आणि जीएसटी रिफंडांची प्रक्रिया वेगवान करण्याची मागणी केली.

सध्या व्यवसाय कर 30 टक्के असून तो 18 ते 25 टक्क्यांपर्यंत आणण्याची मागणी करण्यात आली. अर्थमंत्र्यांनी 25 टक्के व्यवसाय कर करण्याचे आश्वासन दिले आहे. अर्थमंत्री आपला शब्द पाळतील असे आम्हाला वाटते असे फिक्कीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी म्हटले. सरकारने नवीनतेला समर्थन देणे, एमएसएमई प्रकारातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत रोजगारनिर्मिती, करमुक्त उत्पादन करत निर्यातीस मदत करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करात कपात करण्यात येत आहे. भारतातील व्यवसाय कर सर्वाधिक असून खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जीएसटीमुळे करात वाढ झाल्याचे सीआयआयच्या अध्यक्षा शोभना कमिनेनी यांनी म्हटले.

Related posts: