|Thursday, December 14, 2017
You are here: Home » उद्योग » सार्वजनिक कर्जात 2.53 टक्क्यांनी वाढ

सार्वजनिक कर्जात 2.53 टक्क्यांनी वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर तिमाहीत गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत केंद्र सरकारच्या सार्वजनिक कर्जात 2.53 टक्क्यांनी वाढ झाली. सार्वजनिक कर्ज आता 65.65 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत सरकारचे या क्षेत्रातील कर्ज 64,03,138 कोटी रुपये होते. गेल्या तिमाहीत ते 65,65,652 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे सार्वजनिक कर्ज व्यवस्थापनाच्या तिमाही आकडेवारीतून समजते. सार्वजनिक कर्जामध्ये अंतर्गत कर्जाचा हिस्सा 93 टक्के आहे आणि बाजारातील सिक्युरिटीचा हिस्सा 82.6 टक्के आहे. दुसऱया तिमाहीत सरकारकडून 1.89 लाख कोटी रुपयांचे सिक्युरिटी बाजारात आणण्यात आली. पहिल्या तिमाहीत 1.68 लाख कोटी रुपयांची सिक्युरिटी आणण्यात आली होती. 2017-18 च्या पहिल्या सहामाहीत अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 61.68 टक्के कर्ज घेण्यात आले.

Related posts: