|Thursday, October 18, 2018
You are here: Home » उद्योग » बिटकॉईनबाबत आरबीआयची सूचना

बिटकॉईनबाबत आरबीआयची सूचना 

वृत्तसंस्था/ मुंबई

बिटकॉईन आपल्या उच्चांकावर पोहोचला असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सूचना जाहीर करण्यात आली आहे. बिटकॉईन 12 हजार डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. बिटकॉईन आणि आभासी चलनाचे वापरकर्ते, साठवणूक करणारे, व्यापारी यांना कोणत्याही प्रकारचा परवाना देण्यात आला नाही. देशात याचा वापर अधिकृत करण्यात आलेला नाही, असे आरबीआयने संदेशात म्हटले. यापूर्वी फेब्रुवारी 2017 आणि डिसेंबर 2013 मध्ये अशा प्रकारची सूचना जाहीर करण्यात आली होती.

आभासी चलनाच्या टेडिंगला परवानगी देण्यात आलेली नाही. आपल्या परवानगीशिवाय व्यवसाय करण्यात येत असून हा धोकादायक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बिटकॉईन आणि अन्य आभासी चलनांचा वापर आणि टेडिंग वाढत आहे असे सांगण्यात आले. देशात आभासी चलनाच्या वापरासाठी कोणतीही नियमावली नाही. तसेच या चलनावर कोणत्याही देशाचे अथवा मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण नाही. चालू वर्षात बिटकॉईनचे मूल्य 11 पटींनी वाढले आहे.

Related posts: