|Sunday, July 22, 2018
You are here: Home » उद्योग » रेपो दरात बदल नसल्याने बाजार घसरला

रेपो दरात बदल नसल्याने बाजार घसरला 

बीएसईचा सेन्सेक्स 205, एनएसईचा निफ्टी 74 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

बुधवारी बाजारात तेजीने घसरण झाली. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात येणार असल्याने दिवसभर बाजारात दबाव आला होता. सत्राअखेरीस आरबीआयने पतधोरण जाहीर करत दरात कोणताही बदल करण्याचा निर्णय घेतला नाही, त्यामुळे बाजारात अधिक घसरण झाली. निफ्टी 10,050 च्या खाली घसरला, तर सेन्सेक्स 200 अंशाने कमजोर झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 205 अंशाने घसरत 32,597 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 74 अंशाच्या कमजोरीने 10,044 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात दबाव आला होता. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.9 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.7 टक्क्यांनी कमजोर होत बंद झाला.

आयटी वगळता सर्व क्षेत्राच्या समभागात दबाव आला होता. बँक निफ्टी 1.1 टक्क्यांनी कमजोर होत 24,852 वर बंद झाला. निफ्टीचा धातू निर्देशांक 2 टक्के, पीएसयू बँक निर्देशांक 2.1 टक्के, वाहन निर्देशांक 0.7 टक्के आणि औषध निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरले. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 1.1 टक्के आणि ऊर्जा निर्देशांक 0.9 टक्क्यांनी कमजोर झाला. निफ्टीचा आयटी निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारला.

दिग्गज समभागांची कामगिरी

रिलायन्स, मारुती सुझुकी, हिंदुस्थान युनि, इन्फोसिस 1.76-0.61 टक्क्यांनी वधारले. सन फार्मा, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज ऑटो, ओएनजीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, टाटा मोटर्स, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, आयटीसी 2.31-1.02 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात आयकॉप, अजंता फार्मा, जिंदाल स्टील, युनियन बँक, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, यूबीएल, सेल, जेएसडब्ल्यू एनर्जी, कॅनरा बँक, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स 4.94-2.71 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात शंकरा बिल्डिंग, प्लास्टब्लेंड्स, निटको, पनामा पेट्रोकेम, सारेगामा 15.72-7.25 टक्क्यांनी घसरले.

Related posts: