|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लॉजिंग, सायबर कॅफेतील ग्राहक नोंदी ‘ऍप’वर

लॉजिंग, सायबर कॅफेतील ग्राहक नोंदी ‘ऍप’वर 

कणकवली पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांची माहिती

वार्ताहर / कणकवली:

लॉजिंग व सायबर कॅफेमध्ये असलेल्या रजिस्टरची जागा आता ‘ऍप’ घेणार आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी या ‘ऍप’च्या वापरासंदर्भात जनजागृती करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली. सिटी व्हिजिटर्स इन्फर्मेशन ऍन्ड रेकॉर्ड मेन्टेनन्स सिस्टिम’ नावाचा हा ऍप आता लॉजिंग, सायबर कॅफेमध्ये मोबाईलवर दिसणार आहे. या ऍपच्या माध्यमातून लॉजिंग, सायबर कॅफेत आलेल्यांची नोंद केली जाणार असून हा डाटा पाच वर्षांपर्यंत राहणार आहे.

येथील पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी या ‘ऍप’ची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी येथील एजन्सीने हा ‘ऍप’ तयार केला असून कणकवलीतील लॉजिंग, सायबर कॅफेधारकांना या ‘ऍप’बाबत मार्गदर्शन करण्यात आले. 1 हजार रुपयांना हा ऍप पोलिसांमार्फत देण्यात येणार आहे. ऍप डाऊनलोड करून घेतल्यानंतर ज्या लॉजिंग, सायबर कॅफेत ग्राहकांची एन्ट्री होईल, त्याची नोंद पोलीस अधीक्षक व कणकवली पोलीस स्टेशन व संबंधित ऍपधारकाला दिसणार आहे. ऍप घेतल्यानंतर वेगळे रजिस्टर ठेवण्याची गरज भासणार नसल्याचे खोत यांनी सांगितले.

मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत या ऍपच्या डेमोचे सादरीकरण करण्यात आले. एजन्सीच्या तंत्रज्ञांकडून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आल्याची माहिती खोत यांनी दिली. जिल्हाधिकाऱयांनी काही दिवसांपूर्वी परजिल्हय़ातील किंवा परराज्यातील स्थलांतरित होऊन आलेल्या खाण कामगार, मजूर आदींबाबत अद्ययावत माहिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थलांतरित व्यक्तींनी जर अशी माहिती पोलीस स्टेशनला दिली नाही, तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात हा ऍप या सर्व सिस्टिमसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

Related posts: