|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत पोईपची ‘नंदीजन्म’ प्रथम

रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत पोईपची ‘नंदीजन्म’ प्रथम 

थिएटर ऍकॅडमी, अक्षरसिंधूचे आयोजन

वार्ताहर / कणकवली:

व्होडाफोन प्रस्तुत थिएटर ऍकॅडमी, पुणे व अक्षरसिंधु साहित्य कलामंच, कणकवली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगसंगीत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सांघिकमध्ये वेताळ मुंजेश्वर कलामंच, पोईप यांची ‘नंदीजन्म’ एकांकिका प्रथम आली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच कणकवली येथे झाला. नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : सांघिक द्वितीय – एकांकिका संगीत ही शिवपंचायतीची दुसरी बाजू (कलांकुर ग्रुप, मालवण), तृतीय – संगीत म्युन्सिपाल्टिकरण (अक्षरसिंधु साहित्य कलामंच, कणकवली), उत्तेजनार्थ – संगीत गनिमी कावा (चंद्रभागा थिएटर्स, कणकवली).

गद्य विभागातील सांघिक विभागून एकांकिका – नकळत (सद्गुरु समर्थ कलामंच, देवगड) व संदूक (श्री समर्थ कलाविष्कार, देवगड). दिग्दर्शन प्रमाणपत्र  एकांकिका – नकळत, कोष. नेपथ्य प्रमाणपत्र एकांकिका – बॉम्ब ए मेरी जान. प्रकाशयोजना प्रमाणपत्र – गनिमी कावा, म्युन्सिपाल्टिकरण, संदूक व ए शिवाजी कौन था. संगीत, पार्श्वसंगीत प्रमाणपत्र – संदूक, नकळत. रंगभूषा, वेषभूषा  प्रमाणपत्र – गनिमी कावा, श्री नाटक कांबळी. अभिनय प्रमाणपत्र पुरुष – केअरटेकर – एकांकिका संदूक – राजेंद्र बोडेकर, अश्फाक एकांकिका – ये शिवाजी कौन था – प्रकाश मालंडकर. अभिनय प्रमाणपत्र स्त्राr – माधवी एकांकिका – न कळत – सोनल उतेकर, नयना – एकांकिका, बॉम्ब ए मेरी जान, श्यामल – नूतन गावकर, एकांकिका – ए शिवाजी कौन था – कु. मिताली मालवणकर. विशेष उल्लेखनीय नैपुण्य पुरस्कार – संभाळी एकांकिका संगीत, गनिमी कावा – यश तेली. मैत्रेयी – एकांकिका संगीत गनिमीकावा कु. मैत्रिय आपटे.

बक्षीस वितरणप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष दादा कुडतरकर, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, परीक्षक धीरज कुलकर्णी, थिएटर ऍकॅडमीचे सागर अत्रे, अक्षरसिंधुचे अध्यक्ष हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे, उपाध्यक्ष महानंद चव्हाण, किशोर कदम, सचिव नीलेश महिंद्रकर, ऋषिकेश कोरडे, संजय मालंडकर, रुपेश नेवगी, शेखर गवस, मिलींद गुरव, विवेक वाळके, पल्लवी माळवदे, ऋतुजा कोरडे, अंकिता नाईक आदी उपस्थित होते.

यावर्षी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. नाईक म्हणाले, कणकवलीच्या सांस्कृतिक चळवळीत अक्षरसिंधुचे मोठे योगदान आहे. गेली 25 वर्षे सांस्कृतिक चळवळ राबवित असल्याबाबत त्यांनी कौतूक केले. तसेच अक्षरसिंधुला यापुढेही आमचे सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.