|Friday, April 27, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » झाड पडल्याने कारचे नुकसान

झाड पडल्याने कारचे नुकसान 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात एका कारवर झाड पडून कारचे नुकसान झाले. मंगळवारी वादळी वाऱयामुळे हे झाड पडल्याचे विद्यापीठातून सांगण्यात आले.

विद्यापीठात प्राध्यापकांना राहण्यासाठी  क्वाटर्स आहेत. मुलींच्या वसतीगृहाजवळ काही अंतरावर या क्वाटर्स असून एका क्वाटर्समध्ये प्रा. डॉ. ए. डी. जाधव राहतात. क्वाटर्सच्या आवारात अनेक प्रकारची झाडे असून गुलमोहराचे मोठे झाड होते. मंगळवारी डॉ. जाधव यांनी क्वाटर्ससमोर आणि झाडाखाली आपली कार पार्क केली होती. दरम्यान, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास येथील गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. हे झाड जाधव यांच्या कारवर पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारवर झाड पडल्याने जाधव कुटुंबियाचा गोंधळ उडाला. हे वृत्त कळताच विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थ्यांची गर्दी झाली. यावेळी उपस्थितांनी झाडाच्या फांद्या तोडून कारवरील झाड बाजूला केले.

Related posts: